शेतीशिवार टीम, 14 जून 2022 : बारामती आणि शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक : 2022 साठी आरक्षण सोडत सोमवारी जाहीर झाली आहे. बारामतीमधील 20 प्रभागांतील 41 जागांपैकी 21 जागा महिलांना राखीव ठेवल्या आहेत. आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत जाहीर केली.

तर शिरूर नगरपरिषदेमध्ये यंदा 24 नगरसेवक असणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ‘9′ अ’ आणि ‘10 अ’ अनुसूचित जाती महिला तसेच प्रभाग क्रमांक ‘11 अ’ अनुसूचित जमाती महिला जागेसाठी आरक्षित झाला आहे. त्यावर हरकती, सूचना 15 जून ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येणार असल्याचं प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितलं…

त्यामध्ये अनुसूचित जाती (महिला) दोन, अनूसूचित जमाती (महिला) एक, तर सर्वसाधारण गटातील महिलांसाठी नऊ जागा आरक्षित आहे. प्रभाग राखीव झाल्याने त्यांना आता उमेदवारीसाठी नवा प्रभाग शोधावा लागणार आहे.

नव्याने जाहीर झालेल्या प्रभागात मोठे फेरबदल झाल्याने निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांचे बारामतीतील आणि शिरूरमधील अनेक दिग्गजांचा चांगलाच कस लागणार आहे. तर आरक्षण साडत झाल्यावर गटातटाच आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी होणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी बारामतीकर आणि शिरुरकर उत्सुक आहेत. या दोन्ही राष्ट्रवादीचे 20 वर्षांपासून एकहाती वर्चस्व असून ते यावेळी नगरपरिषदेत सत्ता मिळवतात का ? हे पण उत्सुकतेचं ठरणार आहे.

शिरूर नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :- 

प्रभाग क्रमांक – 1 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 2 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 3 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 4 अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक – 5 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 6 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्र- 7 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 8 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 9 अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक – 10 अनूसूचित जाती महिला व सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक – 11 अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक – 12 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण.

बारामती नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : –

प्रभाग क्र – 1 अ- अनुसूचित जाती महिला, ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र – 2- अ- सर्वसाधारण महिला – ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र- 3 अ- सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र – 4- अ- सर्वसाधारण महिला, ब – सवसाधारण
प्रभाग क्र – 5- अ सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र – 6 अ – सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र – 7 – अ सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 8 – अ – सर्वसाधारण महिला, ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र – ९ – सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 10- अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र- 11 – अ सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र – 12- अ – अनुसुचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र – 13 – अ – अनुसुचित जाती (महिला), ब – सर्वसाधारण
प्रभाग क्र- 14 – अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्र – 15 – अ – सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण,
प्रभाग – 16 अ – अनुसुचित जाती, ब – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग- 17 – अ- सर्वसाधारण (महिला), ब – सर्वसाधारण
प्रभाग- 18 अ- अनुसुचित जाती , ब- सर्वसाधारण (महिला)
प्रभाग- 20 – अ- अनुसुचित जाती, ब सर्वसाधारण ( महिला ), क- सर्वसाधारण (महिला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *