शेतीशिवार टीम, 14 जून 2022 : देशसेवा करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वपूर्ण बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाने सैन्य भरती (Army Recruitment) प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. Army भरतीसाठी सरकारने ‘अग्निपथ भरती योजना’ सुरू केली आहे.
घोषणा करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, याअंतर्गत अग्निवीर म्हणजेच तरुणांना 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. लष्कराचे सरासरी वय कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचललं आहे. ते म्हणाले की, सध्या लष्कराचे सरासरी वय 32 वर्षे आहे, ते पुढील काही वर्षांत 26 वर्षे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ही योजना संरक्षण दलांचा खर्च आणि वय कमी करण्याच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचं मानलं जातं. अशा परिस्थितीत ही योजना काय आहे आणि तरुणांना संधी कशी मिळणार आहे ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तेच प्रश्न आपण मुद्द्यांद्वारे खाली दिलेले आहेत वाचा…
पहा मोदींनी घोषणा केलेल्या अग्निपथ भरतीचे ठळक मुद्दे….
‘अग्निपथ भरती योजने’ अंतर्गत, तरुण 4 वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होतील आणि देशाची सेवा करतील.
चार वर्षांच्या शेवटी, सुमारे 75% सैनिकांना कर्तव्यातून मुक्त केलं जाईल आणि त्यांना पुढील रोजगाराच्या संधींसाठी सशस्त्र दलांकडून मदतही मिळेल.
4 वर्षांनंतरही केवळ 25% जवानांना संधी मिळणार आहे. मात्र, त्यांना पुन्हा 6 महीन्यांच अतिरिक्त प्रशिक्षण घ्यावं लागेल..
4 वर्षांची नोकरी सोडल्यानंतर तरुणांना सेवा निधी पॅकेज देण्यात येणार आहे. जे 11.71 लाख रुपये असणार आहे.
यावर्षी म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत या अग्निपथ योजनेंतर्गत 46 हजार अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत जर अग्निविर देशसेवा करताना मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबियाला 1 कोटींचा निधी आणि पूर्ण सेवानिधी दिला जाईल.
तुम्हाला पगार किती मिळेल ? ते जाणून घ्या :-
वर्ष | महीनेवार वेतन | कँश इन हॅन्ड |
प्रथम वर्ष | 30000 | 21000 |
दूसरे वर्ष | 33000 | 23100 |
तीसरे वर्ष | 36000 | 25580 |
चौथे वर्ष | 40000 | 28000 |
चार वर्षांनी ‘इतकं’ मिळेल सेवा निधी पॅकेज :-
पगारातून कापलेले पैसे अग्निवीर कॉर्प्स फंडात जमा केले जातील. अग्निवीरच्या पगारातून जी रक्कम कापली जाईल, तेवढीच रक्कम सरकार अग्निवीर कॉर्प्स फंडात जमा करेल, जी 4 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर व्याजासह अग्निवीरला परत केली जाईल. ही रक्कम सुमारे 11.71 लाख रुपये असेल, जी सेवा निधी पॅकेज म्हणून उपलब्ध असेल. संपूर्ण रक्कम करमुक्त असणार आहे.