शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : भारतात कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16,764 नवे रुग्ण आढळले असून ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांमध्ये तर भयावह वाढ झाली आहे. ओमिक्रॉनचे आत्तापर्यंत 1270 नवे रुग्ण आढळले आहेत.

यामध्ये 450 रुग्णांसह महाराष्ट्र अव्वल आहे. तर 370 रुग्णांसह दिल्ली आणि 100 रुग्णांसह केरळ तिसऱ्या स्थानावर आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 66,65,290 लसींचे डोस दिले असून, भारतातील कोविड-19 (Covid-19) लसीकरण कव्हरेज 144.54 कोटींच्या पुढे गेले आहे. रिकव्हरी रेट 98.36% आहे.

एका दिवसात कोविड-19 (Covid-19) ची 16,764 नवे रुग्ण आढळल्याने आणि देशात 220 रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण संसर्ग रुग्णांची संख्या 3,48,38,804 झाली आहे. तर मृतांची संख्या 4,81,080 वर पोहोचली आहे.

Omicron व्हेरियंटचा प्रसार 23 राज्यांमध्ये :-

भारतात कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या 309 नव्या रुग्णांमुळे देशातील ओमिक्रॉनची एकूण संख्या 1,270 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमिक्रॉनचे 1,270 नवे रुग्ण नोंदवले गेली आहेत आणि 374 लोक बरे झाले.

.. तर काही दिवसांत शाळा बंद होणार :-

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वाढत आलेख पाहून राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली असून राज्य सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.

येत्या काही दिवसांत म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असून त्याबाबत सध्या टास्क फोर्ससोबत उपाययोजनेबाबत चर्चा सुरु आहे. शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *