शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : टाटा ग्रुपच्या शेयर्सने एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. तेही जेव्हा TTML (Tata Teleservices Maharashtra Ltd) शेअर्स गेल्या 11 सत्रांमध्ये 32.90 टक्क्यांनी घसरल्यानंतर 154.10 रुपयांवर गेल्या 6 दिवसांपासून मोठी वाढ होताना दिसून येत आहे.
आज, सलग सहाव्या सत्रात, वरच्या सर्किटसह सर्वकालीन उच्चांकसह तो 206.35 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात त्यात 83.34% वाढ झाली आहे.
टाटा ग्रुपची कंपनी TTML शेअरने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. आणि सलग 6 दिवस अपर सर्किटमध्ये आहे. एका वर्षात हा स्टॉक 7.90 रुपयांवरून 206.35 रुपयांवर पोहोचला आहे.
म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे एक लाख आता 26 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. या कालावधीत या शेयर्सने 2,528.66% रिटर्न्स दिले आहे.
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे. कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
एक लाखांचे झाले 4 लाख 62 हजार :-
Tata Teleservices (Maharashtra) Limited चे शेअर्स शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि आता शुक्रवारी देखील अपर सर्किटमध्ये आहेत. आज हा शेअर 9.80 रुपये प्रति शेअर वर चढून 206.35 रुपये वर चढला आहे. गेल्या 6 दिवसांबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 26% रिटर्न्स दिले आहे. गेल्या सहा महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर या शेअरमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये आज 4 लाख 62 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.
परंतु, नफावसुलीमुळे सलग 5 दिवस लोअर सर्किट सुरू होतं. या दरम्यान, बीएसईवर (BSE) TTMLचा स्टॉक 32.90 टक्क्यांनी घसरल्यानंतर 154.10 रुपयांवर आला होता. गेल्या 52 आठवड्यांबद्दल बोलायचं झालं तर, 20 डिसेंबर 2021 रोजी तो 189.10 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.