शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : New Year Celebration : 2022 हे वर्ष नवं वर्ष उद्याचं दार ठोठावणार आहे. या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर संपणार आहे आणि उद्या 1 जानेवारी ही तारीख आल्याने सर्व घरांची कॅलेंडर बदलणार आहे.
नवीन महिना, नवीन वर्ष आणि नवीन दिवस. 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात होताच नवे संकल्प, नवे आयाम आणि नवे ध्येय स्थापित करण्यास सुरुवात होईल. केवळ भारतातच नाही तर जगभरात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आज 31 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
पण तुमच्या लक्षात हे आलं आहे का की, नवीन वर्ष 1 जानेवारीपासून का सुरू होतं ? अखेर, नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली ? प्रत्येक देशात नवीन वर्ष फक्त 1 जानेवारीलाच साजरे होतं का ? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत…
1 जानेवारीला नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कधी पासून सुरू झालं ?
1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याची तारीख इतकी मूळ दिसते की, असं वाटतं की नवीन वर्ष नेहमीच या दिवसापासून सुरू झालं असावं.पण प्रत्यक्षात असं नाहीये. शतकानुशतके 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले जात नव्हतं. वेगवेगळे देश आपापल्या इच्छेने नवीन वर्ष साजरे करायचे. कोणी 25 मार्च किंवा 25 डिसेंबर, पहिल्या नवीन वर्षाच्या उत्सवासाठी कोणतीही निश्चित तारीख नसायची. पण काळ बदलला आणि राजा नुमा पॉम्पिलसने (Numa pompils)
रोमन कॅलेंडरमध्ये काही बदल केले. तेव्हापासून, 1 जानेवारी 2021 रोजी जगभरात नवीन वर्षाचा उत्सव सुरू झाला.
वर्षात पहिले फक्त 10 चं महिने असायचे…
शतकांपूर्वी शोधलेल्या कॅलेंडरमध्ये 12 महिन्यांऐवजी फक्त 10 महिने होते. म्हणजेच संपूर्ण वर्ष 10 महिन्यांत संपायचं. राजा नुमा पॉम्पिलसने जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने वर्षात जोडले.
वर्ष फक्त 365 दिवसांचे का असतं ?
जानेवारी आणि फेब्रुवारीची भर पडली तरी जुन्या काळी वर्षात केवळ 355 दिवस असायचे. विसंगती समतोल करण्यासाठी,फेब्रुवारीच्या अखेरीस दर दुसर्या महिन्यात मर्सिडियस नावाचा महिना जोडण्याचा आदेश देण्यात आला. त्या दिवसांत आठवड्यात 8 दिवस होते. परंतु, यानंतर, इ.स.पूर्व 45 मध्ये, रोमचा शासक, ज्युलियस सीझर, याने सर्व उणीवा दूर केल्या आणि आपल्याला रोमन कॅलेंडरची आधुनिक आवृत्ती दिली, ज्याचं आपण आजपर्यंत पालन करतो. सीझरला खगोलशास्त्रज्ञांकडून समजलं होतं की, पृथ्वी 365 दिवस हा तासांत सूर्याभोवती फिरते.
भारतात नवीन वर्ष कधी साजरे केलं जातं ?
तसं, भारतात रोमन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होतं. पण भारतात विविध धर्माचे लोकही आपापल्या चालीरीतींनुसार नवीन वर्ष साजरे करतात. पंजाबप्रमाणेच, बैसाखीच्या दिवशी म्हणजेच 13 एप्रिलला नवीन वर्ष सुरू होतं. जैन धर्माचे अनुयायी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष साजरे करतात. दुसरीकडे, शीख अनुयायी मार्चमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन वर्ष साजरे करतात.