शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : वैवाहिक जीवनामध्ये सेक्सला खूप महत्त्व आहे. तसेच सेक्स पॉवर वाढवण्यासाठी घरगुती उपाय अधिक प्रभावी मानले जातात. अशा अनेक नैसर्गिक गोष्टी असतात जे सहज उपलब्ध होत असतात आणि त्यांचे सेवन करणे देखील महत्वाचं आहे.पण काही लोकांना पुरुषशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपायांची योग्य माहिती नसल्यामुळे ते घातक औषधांच्या किंवा क्वॅकच्या फंदात पडतात.

अशा परिस्थितीत पैशांबरोबरच आरोग्यालाही फटका बसतो. त्यामुळे तुम्ही हे घरगुती उपाय एकदा नक्की जाणून घ्या. ज्यामुळे तुम्ही सेक्स पॉवर वाढवू शकता. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा 2 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने सेक्स पॉवर वाढते. तसेच वाढत्या वयात गमावलेली शक्ती परत आणण्यास मदत होते.

चला तर मग जाणून घेऊया त्या 2 पदार्थांचे नावे :-

1. खजूर :-

खजूर आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळून येतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. हे शारीरिक कमजोरी दूर करण्याचे काम करते. ते खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. तुम्हालाही रोज फ्रेश राहायचे असेल तर दिवसभरात दोन खजूर जरूर खावे. यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते, त्यासोबतच तुमच्या शरीरातील सर्व कमकुवतपणा दूर होतो. खजूर केवळ शारीरिक शक्तीच सुधारत नाही तर पुरुष शक्ती सुधारण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

सेवन करण्याची योग्य पद्धत –

जर पुरुषांना त्यांची सेक्स पॉवर आणि आशक्तपणा आणि सेक्सशी संबंधित कोणतीही समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी तुम्ही खजूर खावे. यासाठी 2 खजूर रात्रभर दुधात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते खजूर आणि दूध प्या.

शेळीच्या दुधात भिजवून सेवन केल्यास त्याचा दुप्पट फायदा होतो. हा उपाय रोज करा. तुम्हाला लवकरच तुमच्या समस्येमध्ये फरक दिसेल.यासोबतच पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, गॅस इत्यादीपासूनही आराम मिळेल. यासोबतच शारीरिक दुर्बलता दूर होऊन शरीर मजबूत राहील.

2. भोपळ्याच्या बिया –

भोपळ्याच्या बियाना मध्ये झिंक चा उत्कृष्ट स्रोत आहेत. अनेक अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या कमतरते मागे झिंकची कमतरता हे मुख्य कारण आहे. त्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी आणि लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे सेवन केलेच पाहिजे. याचे सेवन केल्याने पुरुषांमधील शारीरिक कमजोरी आणि लैंगिक समस्या दूर होतात.

यासोबतच इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्याही दूर होते. याशिवाय जर तुम्हाला रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असतील तर आम्ही तुम्हाला सांगतो की भोपळ्याच्या बिया ‘ऑक्सिडेटिव्ह’ कमी करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. जे खाल्ल्याने भूक कमी लागते आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी याचे सेवन जरूर करावे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, जे हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

सेवन करण्याची पद्धत –

यासाठी प्रथम भोपळ्यच्या बिया ड्राय फ्रुटसच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात, तर मग ते भाजून घ्या, तुम्ही त्यात दालचिनी, लवंगा, काळी मिरी आणि काळे मीठ घालून सेवन करू शकता. हे खाण्यास चवदार तर असेलच पण आरोग्यासाठीही अनेक फायदे देतं.

याशिवाय भोपळ्याच्या बियांचे सेवन करण्याची दुसरी पद्धत तुम्ही अवलंबू शकता, त्यासाठी भोपळ्याच्या बिया पाण्यात उकळा. नंतर एका ट्रेमध्ये थोडं तेल टाकून हे बिया सुकवून भाजून घ्या. भोपळ्याचे दाणे तळल्यानंतरच खाऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *