शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉन व्हेरियंटही वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे भयावह आकडेवारी समोर येत असताना नेतेमंडळींच्या लग्न सोहळ्यांना हजेरी लावण्याची राजकीय मंडळीच्या ‘लगीनघाई’ने कोरोनाचा राजकीय संसर्ग वाढला मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांच्या विवाह थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात सहभागी झालेले नेते आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे.

या आधी खासदार सुप्रिया सुळे आणि त्याचे पती सदानंद सुळे, हर्षवर्धन पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी, माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण झाली असताना आता अहमदनगरचे दोन दिग्गज नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत

नगरमध्ये काल भाजप नेते शिवाजी कर्डीले यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचा पार फज्जा उडाला. या विवाह सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

परंतु आता जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते म्हणजे भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी’, असं थोरात यांनी ट्विटमध्ये आवाहन केलं आहे.

त्यामुळे नगरमधील आत्तापर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजप नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दिग्गज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *