Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : चिंतेत भर ! पुण्याच्या ग्रामीण भागात Omicron ची एंट्री ; जुन्नरमध्ये आढळले 7 रुग्ण..

0

शेतीशिवार टीम,17 डिसेंबर 2021:- पुण्याच्या ग्रामीण भागात Omicron ची एंट्री झाली असून जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचे 7 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या 7 ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

देशातील Omicron व्हेरियंटच्या कोरोनाबाधितांची संख्या 108 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, Omicron व्हेरियंट हा आत्तापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असून micron चे आता देशभरात 101 रुग्ण झाले आहेत. यापैकी सर्वाधिक 40 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

महाराष्ट्र हे Omicron चं हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये Omicron च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

याशिवाय राजस्थानमध्ये 17, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये 8-8 लोकांना या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. गुजरात आणि केरळमध्ये 5-5 लोक 50 हून अधिक म्यूटेशन सह या व्हायरसने ग्रस्त असल्याचे आढळले आहे.

दुसऱ्या देशांतून भीतीदायक आकडेवारी समोर येत असून अमेरिकेने भारतालाही इशारा दिला आहे. आज यूकेमध्ये 11,708 लोकांना ओमिक्रॉन, डेन्मार्कमध्ये 9009 आणि नॉर्वेमध्ये 1,792 लोकांना संसर्ग झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत, जिथे हा व्हेरियंट प्रथम आढळला होता, आतापर्यंत 1,247 लोकांना संसर्ग झाला आहे. कॅनडा, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि बेल्जियममध्ये 500 पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.