Take a fresh look at your lifestyle.

Share Market : TATA चा हा शेअर आपटला ; राकेश झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत गमावले 318 कोटी !

0

शेतीशिवार टीम,17 डिसेंबर 2021 :- शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला यांना आज शुक्रवारी मोठा फटका बसला. 17 डिसेंबरच्या सकाळी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. जिथे सेन्सेक्स 889.40 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

त्याच वेळी 263 अंकांची घसरण झाली होती. सकाळी शेअर बाजार तेजीत होता, परंतु असे असतानाही टायटनच्या (Titan) शेअर्समध्ये घसरण झाली आहे. यामुळेच राकेश झुनझुनवाला यांना अवघ्या 10 मिनिटांत 318 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

सकाळी 9:25 पर्यंत, सेन्सेक्स प्रति शेअर 2,336 रुपयांवरून 2,283.65 रुपयांपर्यंत खाली आला होता. त्याच वेळी, तो संध्याकाळी 2280.60 रुपयांवर बंद झाला.

राकेश झुनझुनवालाचा Titan मध्ये किती हिस्सा ?

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,37,60,395 शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे सुमारे 3.80 % शेअर्स आहेत. तसेच त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे (Titan) 1.07% किंवा 95,40,575 शेअर्स आहेत. या दोघांना एकत्र पाहिलं तर त्यांच्याकडे टायटनचे 4,33,00,970 शेअर्स आहेत.

किती झालं नुकसान ?

दोघांकडे टायटनचे 4,33,00,970 शेअर्स आहेत. पहिल्या 10 मिनिटांत प्रति शेअर 73.60 रुपयांची घसरण झाली. 73.6 × 4,33,00,970 च्या रेटने सुमारे 318 कोटी रुपयांचे नुकसान झालं.

कंपनी यापुढे कसा करेल बिझिनेस :-

बाजार तज्ज्ञांच्या मते रिटेल गुंतवणूकदारांनी यावेळी खरेदी करणं योग्य ठरेल. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया सांगतात की, एखाद्याने यावेळी शेअर्स खरेदी केले आणि काही काळ ते रोखून ठेवले तर त्याचा फायदा होऊ शकतो. आगामी काळात तो प्रति शेअर 2350 ते 2400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.