Onion Price : निर्यातबंदी असतानाही महाराष्ट्रात कांदा प्रति क्विंटल 2500 पार, काय आहे कारण, भाव आणखी वाढणार का ?
जवळपास तीन महिन्यांपासून निर्यातबंदी असतानाही महाराष्ट्रातील बाजारपेठेतील कांद्याचे भाव इतके स्थिर झाले आहेत की, शेतकरी ना निषेध करू शकले ना आनंद व्यक्त करू शकले. राज्यात कांद्याचा कमाल घाऊक भाव 2500 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला असून, सरासरी 1400 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. आता कोणत्याही बाजारात किमान भाव एक – दोन रुपये किलो राहिला नाही. बाजार समितींमध्ये कांद्याची आवक आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, त्यामुळे भाव आदर्श स्थितीत येऊन स्थिर झाले आहेत. शेतकरी आता निर्यातबंदी उठण्याची वाट पाहत आहेत.
आवक घटल्याने दरात थोडी सुधारणा झाली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. आता शेतकऱ्यांना आशा आहे की सरकार 31 मार्चपर्यंत निर्यातबंदी उठवेल. असे झाले तर किमान रब्बी हंगामात तरी चांगले उत्पन्न मिळू शकेल.
खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. कारण 7 डिसेंबरला खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू असताना केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही.
आवक कमी झाल्याने भाव वाढले..
उदाहरणार्थ, आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव कसे वाढले, आवक आणि भावाच्या जुन्या – नव्या रेकॉर्डवरून जुळवता येतील. महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 25 जानेवारी रोजी सोलापूर मंडईत 1 लाख 44 हजार 801 क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. यापूर्वी 23 जानेवारी रोजी याच बाजारात 98,576 क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
एवढी आवक असल्याने किमान भाव 50 रुपये किलो राहिला. आता 4 मार्च रोजी सोलापूरच्या बाजारात केवळ 30,086 क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक कमी झाल्यामुळे किमान भाव 350 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 3.5 रुपये प्रतिकिलो झाला. येथे कमाल भाव 2300 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल होता..
कोणत्या बाजारात भाव किती ?
खेड बाजार सामितीत 5 मार्च रोजी केवळ 175 क्विंटल कांद्याची आवक झाली असतानाही येथे किमान भाव 1400 रुपये प्रतिक्विंटल तर कमाल भाव 2000 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रतिक्विंटल होता.
पुणे बाजार सामितीत 18,308 क्विंटल कांद्याची आवक झाली, तरीही किमान भाव 600 रुपये प्रतिक्विंटल राहिला. तर कमाल 1800 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
पिंपळगावच्या बाजार सामितीत 13,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान भाव फक्त 600 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल किंमत कमाल किंमत 1966 तर सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
अकोला बाजार सामितीत 490 क्विंटल कांद्याची आवक, किमान भाव 1200, कमाल 2200 आणि सरासरी भाव 1600 रुपये प्रतिक्विंटल राहिला.
कामठी बाजार सामितीत 23 क्विंटल कांद्याची आवक, किमान भाव 1500, कमाल 2500 आणि सरासरी भाव 200 रुपये प्रतिक्विंटल राहिला.