केंद्राने कांद्यावर मार्चपर्यंत निर्यात बंदी घातल्यानंतर स्थानिक बाजारातील आवकवर अद्याप परिणाम झालेला नाही. आज मंगळवारी, 12 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील बाजार समितीत 4944 क्विंटल कांद्याची आवक झाली असून प्रतवारीनुसार 2 हजार ते 4 हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
किरकोळ बाजारात याच कांद्यास 40 ते 60 रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र, नाशिकवरून येणाऱ्या कांद्याचा लिलावाचा तिढा न सुटल्यास आगामी दिवसांत आवक मंदावून भाववाढीचे संकेत आहे. त्यामुळे ग्राहकांचा बांदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्राने 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी घातल्याने कांदा उत्पादक चांगलेच चिडले असून त्यांनी लिलाव बंद पाडले आहेत. त्यामुळे या भागातून येणाऱ्या कांद्याची आवक थांबण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारात नाशिक, लासलगाव, नगर या जिल्ह्यासह गुजरातमधून कांद्याची आवक होते.
महिन्यात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत असताना आता नाशिक भागात लिलाव बंद पडल्याने तेथील व्यापाऱ्यांनी परजिल्ह्यातील बाजारांकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात सद्याही कांदा येत आहे अमरावती व विदर्भात उन्हाळ कांद्याची लागवड होते. त्यामुळे स्थानिक कांदा सद्या उपलब्ध नाही.
रब्बी हंगामात जिल्ह्यात 919 हेक्टर क्षेत्रात पेरणी असून पातीवरील कांदा बाजारात आला आहे. तो ग्राहकांसाठी पुरेसा नसल्याने तसेच उन्हाळ कांदा एप्रिल व मे महिन्यात येत असल्याने नाशिक गुजरातमधून येणाऱ्या कांद्याचा ग्राहकांना आधार असतो. साठवणीतील उन्हाळ कांदाही संपुष्टात आला आहे, त्यामुळे गेल्या महिन्यात कांदा शंभरीच्या जवळ टेकला होता.
सद्या बाजारात नाशिक व गुजरातमधील कांद्याची मुबलक आवक असल्याने ग्राहकांना परवडणाऱ्या भावात मिळत असला तरी नाशिक भागातील लिलावाचा तिढा न सुटल्यास आगामी दिवसांत आवक मदावून काद्याच भाव वधारून बांदा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
पहा, आजचे कांदा बाजारभाव..