Take a fresh look at your lifestyle.

ऊस संजीवनी पॅटर्नची महाराष्ट्रभर चर्चा! एकरी मिळतंय तब्बल 80 ते 150 टनांपर्यंत उत्पन्न, पहा वर्षभर असा आहे ऊस नियोजनाचा चार्ट..

0

1965 पासून महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांत उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसं पाहिलं तर एक एकर शेतात सामान्यतः 25 ते 30 टन उसाचे उत्पादन होते, पण तुम्ही ऊस पीकासाठी वर्षभर योग्य नियोजन केलं तर तुम्हाला जवळपास 100 टनांच्या पुढे उत्पन्न मिळू शकतं अन् तुम्ही एकरी तब्बल 8 लाखांपर्यंत नफा मिळवू शकता. हो हे शक्य आहे, सध्या राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आडसाली ऊस संजीवनी लागवडीची चर्चा आहे. 

ही ऊस लागवड पद्धतीचा सांगली जिल्ह्यातील कृषिभूषण संजय माने यांनी सर्वप्रथम उसाचा एकरी 100 टन यशस्वी प्रयोग करून असंख्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. परंतु या ऊस संजीवनी चार्ट बद्दल अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही, त्यामुळे आज आपण हा ऊस संजीवनी चार्ट शेतकऱ्यांसाठी शेतीशिवार पोर्टलवर प्रसिद्ध करत आहेत तो काळजीपूर्वक वाचावा.. .

ऊस पीकासाठी वर्षभर काय काय नियोजन करावयाचे याचा एक चार्ट पाठवित आहे. हा सेव करुन ठेवावा, वेळो वेळी पहावे.

1. जमिनीत पाचट कुटटी करुन गाढावी.

2. रोटर मारुन नांगरट करावी. शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करावी.

3. सेंद्रीय खतांचा मुबलक वापर करावा. शेणखत 20 टन किंवा कंपोस्टखत 15 टन , हिरवळीचे खत , गांडुळ खत इत्यादिं द्यावेत.

4. ढेकळे फोडुन बारीक करुन घेऊन सरी काढावी.

5. सरी मध्ये थोडेसे सेंद्रीय खत पसरुन घ्यावे. शक्य असलेस कारखान्याची काळी राख 800 – 900 किलो पसरुन घ्यावे.

6. सरी मध्ये सेंद्रीय खतावर रासा खते – बेसल डोस टाकुन हलक्याश्या अवजाराने सरीतल्या मातीत मिसळुन घ्यावे. मातीत मिसळुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

लागणीच्या वेळी..

7. बियाण्यावर बुरशीनाशक व किटक नाशकाची प्रक्रीया करुनच लागण करावी.

बुरशीनाशक 1 ग्रॅम, किटक नाशक 1 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळावे आणि बियाणे दहा ते पंधरा मिनीटे बुडवावे.

8. लागण करणे पुर्वी सरीत पाणी देऊन जमीन ओलावुन घ्यावी. कोरड्यात लागण करुन लगेचच पाणी द्यावे. किंवा पाण्यात लागण करावी.

9. लागणीनंतर सहा सात दिवसात हलकेसे पाणी द्यावे.

आळवणी

पांढऱ्या मुळ्यांची वाढ भरपुर आणि जोमाने होते
फुटवे एकसारखे , जोमदार व योग्य प्रमाणात मिळतात
प्राथमिक वाढ चांगली होते
खतांचे शोषण चांगले होते
रोप लावणी नंतर 2-4 दिवसानी किंवा कांडी लावणी नंतर 6-8 दिवसानी आणि जमीनीत ओल असताना..
1) 12 :61 : 00 – 1 किलो
2) ब्लॅक बॉक्स 1
3) बुरशी नाशक 400 ग्रॅम
4) किड नाशक 400 मिली
200 लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी..

सरीची रुंदी

10. मध्यम व हलक्या जमीनीत साडेचार फुटी व मध्यम व खोल काळ्या जमीनीत पाच फुट रुंदीची सरी काढावी. पॉवर टिलरने भरणी होते. आणि सहा फुटी सरी काढली तर चार चाकी लहान ट्रॅक्टरने भरणी होते..

बियाणातील अंतर

11. मध्यम व हलक्या जमीनीत एक डोळा दीड फुटावर व मध्यम व खोल काळ्या जमीनीत एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावावे..

तण नाशक

12 . लागणी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी जमीनीत ओल असताना मेट्रीब्युझिन ची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यातून समान फवारावे..

बेसल डोस

13. अ. डी ए पी 100 किलो
ब. पोटॅश 75 किलो
क. सु अ द्रव्ये 15 किलो
ड. गंधक 15 किलो
ई. मॅग्ने सल्फेट 25 किलो
फ. किटक नाशक 10 किलो (फरटेरा)

जिवाणु लागणी पासुन 10 व्या दिवशी..

14. अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर
ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर
क. ट्रायकोडर्मा 1 लिटर
200 लिटर पाण्यात मिसळुन जमीनीत ओल असताना आळवणी करावी किंवा पाट पाण्यातुन सोडावे. ड्रिप असेल तर त्यातुन सोडावे.

डोस क्रमांक 2 लागणी पासुन 20 / 25 दिवसांनी

15. अ. युरीया 45 किलो सरीत टाकावे..

डोस क्रमांक 3 लागणी पासुन 40 / 45 दिवसांनी
16. अ. युरीया 90 किलो सरीत टाकावे.

ऊस संजीवणी फवारणी क्रमांक 1 लागणी पासुन 45 व्या दिवशी

17. पहिली फवारणी ( 60 लिटर पाणी पुरते )
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान “खोड किड” येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

डोस क्रमांक 4 लागणी पासुन 60/65 दिवसांनी 

18. अ. युरीया 45 किलो
ब. 242400 100 किलो
क. पोटॅश 50 किलो
ब. लिंबोळी पेंड 10 किलो
मिसळुन पहारीने एकाच बगलेत 4 ते 6 इंच खोलीचे छिद्र घ्यावे आणि दोन छिद्रात एक फुट अंतराने खते घालुन मुजवुन घ्यावे.

ऊस संजीवनी फवारणी क्रमांक 2 लागणी पासुन 65 व्या दिवशी

19. दूसरी फवारणी (90 लिटर पाणी पुरते)
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान “खोड किड” असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

ऊस संजीवणी फवारणी क्रमांक 3 लागणी पासुन 85 व्या दिवशी

20. तीसरी फवारणी (135 लिटर पाणी पुरते)

डोस क्रमांक 5 लागणी पासुन 90 ते 120 दिवसांनी

21. अ. युरीया 135 किलो
ब. 242400 100 किलो
क. सिं सु फॉस्फेट 150 किलो
(ब आणि क ऐवजी डिएपी 100 किलो चालते)
ड. पोटॅश 100 किलो
ई. लिंबोळी पेंड 100 किलो
उ. सु अ द्रव्ये 15 किलो
ए. गंधक 15 किलो
ऐ. मॅग्ने सल्फेट 25 किलो
सरीत टाकुन भरणी पुर्ण करावी.

जिवाणु भरणी पासुन 10 व्या दिवशी

22. अ. नत्र स्थिर करणारे 1 लिटर
ब. स्फुरद विरघळणारे 1 लिटर
क. ट्रायको 1 लिटर

ऊस संजीवनी फवारणी क्रमांक 4 लागणी पासुन 105 व्या दिवशी

23. चौथी फवारणी (150 लिटर पाणी पुरते) ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची शक्यता कमी असते.

डोस क्रमांक 6 भरणी पासुन 30 दिवसांनी
24. अ. अमो सल्फेट 45 किलो
ब. 242400 100 किलो
क. पोटॅश 25 किलो
ब. लिंबोळी पेंड 10 किलो मिसळुन सरीत टाकावे.

ऊस संजीवनी फवारणी क्रमांक 5 लागणी पासुन 125 व्या दिवशी

25. पाचवी फवारणी (शक्य झालेस) (180 लिटर पाणी पुरते)

डोस क्रमांक 7 भरणी पासुन 60 दिवसांनी

26. अ. ॲमो सल्फेट 50 किलो
ब. पोटॅश 25 किलो

महत्वाचे.. 

1) कॅलशियम नायट्रेट 7 किलो माठ्या भरणी नंतर 15 दिवसानी स्वतंत्रपणे ध्यावे.
2) नंतर 15 – 15 दिवसाचे अंतराने कॅलशियम नायट्रेट 3 – 3 किलो तीन चार वेळा स्वतंत्र दिल्यास ऊसाची जाडी वाढणेस फार मदत होते.
3) सुक्ष्म अन्न द्रव्ये देण्या पुर्वी माती परीक्षण करुन कोणते सुक्षम अन्न द्रव्ये कमी किंवा जास्त आहेत ते पहावेत.
4) खालील प्रमाणे सुक्ष्म अन्न द्रव्याचे नियोजन केल्यास ऊस उत्पादन वाढिस फारच उपयुक्त ठरते.
अ. फेरस सल्फेट 10 किलो
ब. झिंक सल्फेट 10 किलो
क. कॉपर सल्फेट 0.5 किलो
ड. मॅंगेनिज सल्फेट 5 किलो
इ. बोरॉन 1 किलो
असे मिश्रण तयार करुन याची उपयुक्तता फारच वाढते.
पैकी अ. आणि ब. दोन्ही वेगवेगळे थोड्याश्या सेंद्रीय खतात एक दोन दिवस मिसळुन ठेवलेस त्याचे चिलेशन होते व उपलब्धता वाढते.

फवारणी बाबत किंवा संजीवके उपलब्धते बाबत माहीती हवी असलेस सम्पर्क साधावा.
अजिंक्य – 9403964040
ऊस संजीवनी स्टॉक पॉईंट गेली 12 वर्षे कार्यरत आहे.

गुजरात येथे 500 एकर वर कृषिभूषण संजीव माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 100 मे टन ऊस उत्पादन प्रकल्पाचा व्हिडीओ पाहण्यासाठी.. 

येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.