Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! 169 कोटींचा निधी पणन विभागाकडे वर्ग, ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 15,000 रु. बोनस..

0

शिंदे – फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात धानाला हेक्टरी 15 हजार बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत होते. अखेर शासनाने जिल्हा पणन विभागाकडे 169 कोटींचा निधी वळता केला आहे. जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तो निधी लवकरच वळता करण्यात येईल.

गतवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे धान पिकाचे उत्पन्न चांगले होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पावसाळ्यात तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे धान पीक वाहून गेले. सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बांध्यातील धान कुजले.

त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांनी देखील पिकावर हल्ला चढविला. परिणामी, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाला मुकावे लागले. त्यामुळे धानाला बोनस जाहीर करण्यात यावा, अशी मागणी होत होती. शेतकऱ्यांची रास्त मागणी लक्षात घेता, शिंदे – फडणवीस सरकारने धानाला सरसकट बोनस देण्याचे जाहीर केले. त्याचे परिपत्रकदेखील निघाले.

मात्र, बोनसची रक्कम रखडली होती. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी मान्य झाली असून अखेर जिल्हा पणन अधिकारी कार्यालयास धानाच्या बोनसचा निधी प्राप्त झाला आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 लाख 14 हजार 947 नोंदणीकृत शेतकऱ्यांचे 169 कोटी 21 लाख 67 हजार 280 रुपये प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे,

नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मिळणार बोनस

जिल्ह्यात शेतकन्यांची संख्या 1 लाख 14 हजार आहे. या शेतकऱ्यांना बोनस रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहन रकमेला मुकावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.