गाईसाठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजारांचे अनुदान ! शासनाकडून लाभ घेण्याचे आवाहन, अर्जासह सादर करा ‘ही’ 7 कागदपत्रे..

0

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील सटाणा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत संयुक्त दायित्व गटाच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबविण्यासाठी अर्थसाह्य करण्याच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी डॉ. बी. एम. पाटील यांनी केले आहे.

सटाणा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी संयुक्त दायित्व गटाच्या माध्यमातून पथदर्शी दुग्धविकास प्रकल्प राबविण्याकरिता अर्थसाह्य करणारी योजना मंजूर करण्यात आली आहे.

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. 5 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, कळवण यांच्या कार्यक्षेत्रातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयात वाटप व स्वीकारण्यात येणार आहेत.

मुदतीनंतर अर्जांचे वाटप व स्वीकार केला जाणार नाही, असेही डॉ. पाटील यांनी कळविले आहे.

ही आहेत अर्जासह सादर करावयाची कागदपत्रे..  

लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा

जातीचा दाखला

आधार कार्ड

रेशन कार्ड

लाभार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँक खाते पासबुकची झेरॉक्स

अलीकडील एक वर्षाच्या आतील उत्पन्नाचा दाखला/ बीपीएल दाखला

दिव्यांग विधवा, परित्यक्ता प्रमाणपत्र (असल्यास)

मतदान किंवा पॅनकार्ड

दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

यापूर्वी या योजनेचा लाभ या कार्यालयाकडून किंवा अन्य शासकीय विभागाकडून घेतला नसल्याच स्वयंघोषणापत्र

ग्रामसभेचा ठराव गट नोंदणी प्रमाणपत्र..

पहा 4 गाय – 2 म्हैस / 10 शेळ्या आणि 1 पैदाशीचा बोकड, 1000 मांसल कुक्कुट पक्षी वाटपासाठी..

इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.