पुणे मेट्रोने फुगेवाडी (पिंपरी – चिंचवड मनपा हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे मनपा हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर ट्रायल रन घेतली. पुणे मेट्रोमध्ये पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते स्वारगेट स्थानक (17Km) आणि वनाझ स्थानक ते रामवाडी स्थानक (16 Km) असे 33Km लांबीचे दोन मार्ग आहेत.

पुणे मेट्रोचे 85% काम पूर्ण झाले असून उर्वरित 21Km मार्गाची कामे जोमाने सुरू आहेत. काही महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होऊन ते प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील.

नुकतेच पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज स्थानक ते सिकिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि रेंजहिल स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक अशा चाचण्या पूर्ण केल्या.

मेट्रोने फुगेवाडी स्थानक येथून मेट्रो ट्रेनची चाचणी सकाळी 10.30 वाजता सुरू केली. दापोडी स्थानक, बोपोडी स्थानक, खड़की स्थानक, रेंजहिल स्थानक आणि शिवाजीनगर स्थानक अशी स्थानके पार, करून मेट्रो ट्रेन 11.15 वा. सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक येथे पोहोचली. या चाचणीसाठी 45 मिनिटे वेळ लागला.

तसेच, दूसरी चाचणी सकाळी 11.20 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) येथून सुरू झाली आणि बनाझ (उन्नत स्थानक) येथे 11.45 वा. पूर्ण झाली या चाचणीसाठी 25 मिनिटे वेळ लागला.

या दोन्ही चाचण्या नियोजित उद्दिष्टानुसार पार पडल्या. एकूण 15 किमी (फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट भूमिगत स्थानक सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ 8 किमी आणि (उन्नत स्थानक – 7 किमी) मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.

पुणे – पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण Route Map (Phase 1 & Line-3) पाहण्यासाठी..


इथे क्लिक करा

 

या चाचणीमुळे पिंपरी – चिंचवड आणि पुणे या जुळ्या शहरांमध्ये पहिल्यांदा मेट्रो धावली. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गिकमुळे ही दोन्ही जुळी शहरे ‘मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम’द्वारे जोडली जाणार आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक नोकरी किंवा कामधंद्यासाठी ये – जा करीत असतात.

मेट्रो सेवेमुळे जलद आणि सुरक्षित असा शहरी वाहतुकीचा पर्याय या नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ स्थानक या उन्नत मार्गावरील चाचणी पूर्ण झाल्याने येत्या काही महिन्यांत हा मार्ग सुरु होऊ शकेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फायदा होणार आहे.

येत्या काही महिन्यांत पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते वनाझ स्थानक असा प्रवास करणे शक्य होणार आहे. पिंपरी – चिंचवड येथील नागरिकांना खडकी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (ना. गोपाल कृष्ण गोखले रस्ता), गरवारे महाविद्यालय, नळ स्टॉप, बनाझ इ. ठिकाणी मेट्रोने जाणे शक्य होणार आहे .

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, आजची फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावरील चाचणी पिंपरी – चिंचवड आणि पुणे या शहरांसाठी ऐतिहसिक घटना आहे.

पिंपरी – चिंचवड आणि पुणे ही जुळी शहरे मेट्रोमुळे जोडली जाणार असून येत्या काही महिन्यांत पिंपरी – चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक असा थेट प्रवास करणे शक्य होईल. पुणे मेट्रोचे 85% काम पूर्ण झाले असून, उर्वरित भागांची कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *