राज्यातील 7 हजार 950 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातही 203 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले गड राखले तर अनेकांना आपल्या होम ग्राउंडवरच पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या काष्टी ग्रामपंचातीत बबनराव पाचपुते यांची 40 वर्षांची सत्ता संपुष्ठात आली असून त्यांचेच पुतणे हे साजन पाचपुते यांनी सरपंच पदाची निवडणुक जिंकली तर आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला. या सरपंच पदाच्या निवडणुकीत पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांचा 160 मतांच्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागलं.

परंतु आता तालुक्यात उपसरपंच पदाच्या निवडणूका पार पडत आहे. बबनराव पाचपुते गटाचा जरी सरपंच निवडून आला नसला तरी त्यांच्याकडे 17 पैकी 10 सदस्य निवडून आले होते, त्यामुळे उपसरपंच पद त्यांच्याकडे येईल अशी शक्यता होती. परंतु आता या उपसरपंच पदाच्या निवडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

झालं असं की, उपसरपंच पदासाठी आ.बबनराव पाचपुते यांच्या गटाचे स्पष्ट बहुमत असताना सरपंच साजन पाचपुते यांनी पाचपुते गटाला पुन्हा मोठा धक्का देत एक सदस्य फोडत उपसरपंच पदही साजन पाचपुते यांनी खेचून आणले होते.

परंतु आता हा पराभव पाचपुते गटाच्या जिव्हारी लागल्याने सर्व 10 सदस्यांना आदेश आले अन् आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी आपले राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांचेकडे सुपूर्त केल्याने तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे माजी मंत्री आ. पाचपुते यांच्या मुलाचा त्यांच्याच पुतण्याने पराभव करत सरपंचपद ताब्यात घेत आ. पाचपुते यांनी मोठा धक्का दिला. त्यांनतर उपसरपंच पदासाठी गुरुवारी गुप्तपणे मतदान घेण्यात आले. यावेळी आ.पाचपुते गटाचा एक उमेदवार फुटल्याने साजन पाचपुते गटाने दुसरा धक्का देत उपसरपंच पदही आपल्या ताब्यात घेतले.

मात्र यानंतर दहाही सदस्यांनी मिळून राजीनामे देण्याचे ठरवले, त्यानुसार आ.बबनराव पाचपुते यांच्या गटाच्या अश्विनी जितेंद्र पाचपुते, रेश्मा वसंत पाचपुते, सुभाष जयसिंग पाचपुते, संध्या आजिनाथ कोकाटे, दादासाहेब गोरख कोकाटे, अलका शांताराम राहिंज, सुरज रहिंज, महेश दिलीप दरेकर, तनुजा शिवाजी गवळी, कामिनी अनिल पवार या 10 उमेदवारांनी प्रतिज्ञा पत्र तयार करत आपले राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांच्याकडे शुक्रवारी सकाळी सुपूर्द केल्याने तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे .

आ . पाचपुत गटाच्या 10 ग्रामपंचायत सदस्यांनी शुक्रवारी आपल्या सदस्य पदाचे दिलेले राजीनामे सरपंच साजन पाचपुते यांनी मंजूर केले तर काष्टी ग्रामपंचायतमध्ये पोट निवडणूक पुन्हा होणार का ? अथवा साजन पाचपुते राजीनामा मंजूर करणार की नाही याची चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *