शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : PM Kisan New List for 10th Installment : PM किसान सम्मान निधिचा 10वा हप्ता 1 जानेवारीला दुपारी 12 वाजता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पंतप्रधान मोदींकडून करोडो शेतकर्यांना नवीन वर्षाची ही भेट असणार आहे. मात्र, आता PM किसानमधील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने eKYC अनिवार्य केलं आहे. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, याशिवाय डिसेंबर-मार्चसाठी 2000 रुपयांचा हप्ता 1 जानेवारीला खात्यात येणार का?
हे जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमचं स्टेट्स तपासा आणि जर स्टेटसमध्ये FTO जनरेट झाला असेल किंवा FTO जनरेट होईल असे लिहिलं जात असेल तर काळजी करू नका, तुमचा हप्ता नक्कीच जमा होणार. जर हे लिहिलेलं नसेल तर तुम्ही PM किसान ची नवीन यादी जरूर पहा. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.
होम पेजवरील मेनूबारवर जा आणि ‘Farmer’s Corner’ ‘वर जा.
येथेBeneficiary List वर क्लिक / टॅप करा.
त्यानंतर राज्य, जिल्हा, तहसील आणि गावाचं नाव भरून सबमिट करा.
एक नवी लिस्ट तुमच्या समोर आली असेल.
आतापर्यंत झाले नऊ हप्ते प्राप्त :-
AUG-NOV 2021-22 – 9व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 11,12,88,002
APR-JUL 2021-22 – 8व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 11,11,52,851
DEC-MAR 2020-21 – 7व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 10,23,49,456
AUG-NOV 2020-21 – 6व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 10,23,14,245
APR-JUL 2020-21 – 5व्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 10,49,31,270
DEC-MAR 2019-20 – चौथ्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 8,96,00,395
AUG-NOV 2019-20 – तिसऱ्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 8,76,21,282
APR-JUL 2019-20 – दुसऱ्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 6,63,27,601
DEC-MAR 2018-19 – पहिल्या हप्त्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 3,16,10,700
काही त्रुटी आढळतं असेल तर असं करा चेक :-
सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
येथे ‘Payment Success’ टॅब च्या खाली भारताचा नकाशा दिसेल.
त्याखाली ‘Dashboard’ लिहिलेलं असेल त्यावर क्लिक करा.
यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक नवं पेज ओपन होईल.
हे Village Dashboard पेज आहे, येथे तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण माहिती मिळवू शकता…
आधी राज्य निवडा, मग तुमचा जिल्हा, मग तहसील आणि मग तुमचे गाव.
त्यानंतर शो (show) बटणावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यावर क्लिक करा, संपूर्ण डिटेल्स तुमच्यासमोर असेल.
Village Dashboard च्या तळाशी चार बटणे दिसतील, किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर ‘Data Received’ वर क्लिक करा, जे पेंडिंग आहेत त्यांनी दुसऱ्या बटणावर क्लिक करा, तुम्हाला कारणही समजेल…
eKYC आधार अनिवार्य :-
सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) आधार अनिवार्य केलं आहे. पोर्टलवर आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरणासाठी किसान कॉर्नरमधील eKYC पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.
तसं, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे साध्य करू शकता….
24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झालेली पीएम किसान योजना 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावित झाली आहे. योजनेच्या स्थापनेपासून अनेक बदल करण्यात आले आहेत. जसे की आधार कार्ड, होल्डिंग मर्यादा संपुष्टात येणे, स्व-नोंदणी इ…