शेतीशिवार टीम, 16 मार्च 2022 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना PM kisan Samman Nidhi 11 installment . ही सरकारची अशी योजना आहे, ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. म्हणजेच केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 हजार रुपये ट्रान्सफर करत आहे.
या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये पैसे पाठवले आहेत. त्याचा पुढील हप्ता एप्रिल महिन्यात येणे अपेक्षित आहे. मात्र आता नवीन नियमांनुसार ई-केवायसी (e-KYC) करणे आवश्यक असणार आहे. तसे न केल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.
तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक 22 फेब्रुवारी 2022 रोजी काढण्यात आलेलं आहे.
आता या ज्याच्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्याच्या दुरुस्ती, नवीन पात्र झालेले शेतकरी तसेच बोगस अपात्र असलेले शेतकरी याचे फिजिकल व्हेरीफिकेशनही या परिपत्रकामुळे होणार आहे.
पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वी एक-दोन-तीन-चार वितरण झालं होतं परंतु त्यांच्या वेरिफिकेशनच्या नावाखाली किंवा खात्यामध्ये काही दुरुस्ती असल्या कारणामुळे स्टेट लेवल व डिस्टिक लेव्हलवरून हप्ते बंद करण्यात आले होते.
संपूर्ण शासन परिपत्रक लिंकवर क्लिक करून पहा…
तसेच ऑनलाइन पद्धतीनेही बऱ्याच शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असलं तरी व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे त्यांना अद्याप देखील हप्ते सुरू झालेले नाहीत.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंट नंबरच्या व इतर काही माहिती दुरुस्तीचं काम फेब्रुवारी 2020 च्या सुरुवातीपासून हे सर्व कामकाज बंद पडल्याने त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुरुस्त्या झाल्या नव्हत्या लाभार्थ्यांचा नव्याने याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होत नव्हतं.
आता दुरुस्तीसाठी होणार गावनिहाय कॅम्पचे आयोजन…
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित अर्जांच्या डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी, संबधित शेतकऱ्यांना NIC मार्फत दूरध्वनीद्वारे message ( संदेश ) पाठवून त्यांचा अर्ज कोणत्या कारणास्तव प्रलंबित आहे याबाबत कळविण्यात येणार आहे.
तसेच सदर डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी मार्च महिन्यातील चौथ्या शुक्रवारी गावपातळीवर म्हणजेच ( 25 मार्च 2022) तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन सर्व पात्र लाभार्थ्यांचा डाटा दुरुस्त होईपर्यंत करण्यात येणार आहे.
कॅम्पवेळी अर्जदारांना सोबत 7/12 उतारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याबाबत कळविण्यात यावे. डाटा दुरुस्तीचे काम महसूल, कृषी व ग्राम विकास विभागांच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. तसेच याकरिता प्रचार प्रसिध्दी करून कॅम्पचे आयोजन यशस्वी होण्याच्या अनुषंगाने सबंधित जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत लाभार्थ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना भेटावं.
कॅम्पवेळी होणारं व्हेरिफिकेशन व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना रेगुलर हप्ते चालू आहे त्यांना 11व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर तर 31 मार्च 2022 पूर्वी e-KYC (PM Kisan Yojana e-KYC) पूर्ण करावं लागणार आहे. अन्यथा, त्याशिवाय एप्रिल-जुलैचा 2000 रुपयांचा हप्ता खात्यात येणार नाही…
शेतकरी स्वतःही ई-केवायसी (e-KYC) करू शकतात. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल, तर https://pmkisan.gov.in/ वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसीचा पर्याय ऑप्शन निवडा.
पोर्टलवर आधार क्रमांक विचारला जाईल. पोर्टलवर दिसणारा इमेज मजकूर भरल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल. ते भरा आणि Get OTP वर क्लिक करा.
शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, जो पोर्टलवर भरला जाईल आणि सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर ई-केवायसीची (e-KYC) प्रक्रिया पूर्ण होईल. जर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल, तर त्याला जन सुविधा केंद्रात (सेतू) जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी (e-KYC) करून घ्यावे लागेल…
टीप :- जर तुम्ही घरीच मोबाईल वर (e-KYC) अपडेट करत असाल तर बहुतेक लाभार्थ्यांना अपडेटींग एरर येत आहे त्यांनी कॉम्प्युटर ची मदत घेऊन (e-KYC) अपडेट करू शकता. त्यावर अपडेटींग एरर दाखवत नाहीये.