Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल / डिझेल / रॉकेल हे तिन्ही द्रव कच्च्या तेलापासून बनतं, मग त्यांचा कलर वेग-वेगळा का असतो ?

0

शेतीशिवार टीम, 6 मार्च 2022 : UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न : पेट्रोल / डिझेल / रॉकेल हे तिन्ही द्रव कच्च्या तेलापासून बनतं, मग त्यांचा कलर वेग-वेगळा का असतो ?

उत्तर : पेट्रोल, डिझेल, केरोसीन तेल आणि एलपीजी हे सर्व कच्च्या तेलापासून (Crude Oil) बनवलं जातं. हे तुम्हा सर्वांना तर माहीतचं आहे. कच्च्या तेलाचा रंग काळा असतो आणि रिफायनरीमध्ये प्रक्रिया केल्यानंतर ते पाण्यासारखे पूर्णपणे पारदर्शक होतं. प्रश्न असा आहे की, जेव्हा सर्व प्रॉडक्ट कच्च्या तेलापासून बनविली जातात तेव्हा त्यांचे रंग वेगळे का असतात ते जाणून घेउया…

जेव्हा रिफायनरीमध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशनद्वारे कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यातील सर्व कचरा वेगळा केला जातो आणि एक द्रव प्राप्त होतो जो पाण्यासारखा पारदर्शक दिसतो, परंतु जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल पेट्रोल पंपावरून खरेदी केलं जातं तेव्हा ते रंग स्वरूपात असतं.त्यात पेट्रोलचा रंग सोनेरी पिवळा आणि डिझेलचा रंग हलका हिरवा दिसतो. त्याचप्रमाणे केरोसीन (रॉकेल) तेलाचा रंग निळा दिसतो.

खरं तर हे सर्व सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी केलं जातं. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रक्रियेनंतर, पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन तेलामध्ये रंग जोडले जातात. जेणेकरून कोणत्याही सामान्य नागरिकाला तिन्ही पेट्रोलियम पदार्थ सहज ओळखता येतील आणि कोणताही त्रास होणार नाही. सर्व जगात पेट्रोल सोनेरी पिवळे असेलच असे नाही. अनेक देशांमध्ये त्याचा रंगही हलका लालसर / ऑरेंज असतो…

प्रश्न :- संपूर्ण जगाला इंटरनेटशी जोडणाऱ्या ऑप्टिकल फायबरचा शोध कुठे आणि कोणी लावला ?

उत्तर : तुम्हाला तर माहितच असेल की, समुद्राच्या खोलीत असलेल्या ऑप्टिकल फायबर केबलमुळे जगभरात इंटरनेट उपलब्ध आहे, परंतु आपण आज जाणून घेणार आहोत की, ऑप्टिकल फायबरचा शोध कुठे आणि कोणी लावला. चला ऑप्टिकल फायबरचे जनक कोण होते त्यांच्याबद्दल जाणून घेउयात…

तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की,ऑप्टिकल फायबरचा शोध नरिंदर सिंग कपानी यांनी लावला होता. श्री कपानी हे अमेरिकेतील भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ आहेत परंतु त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1926 रोजी भारतातील पंजाब राज्यामधील मोगा शहारात झालानरिंदर सिंग कपानी हे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. ज्यांना ऑप्टिकल फायबरचे जनक म्हणतात.

ऑप्टिकल फायबर केबल ही एक चमत्कारिक वायर आहे, ज्याने अनेक दशकांपासून जगातील सर्वात यशस्वी तांब्याच्या तारांची जागा घेतली आहे. ऑप्टिकल फायबर ही 1970 मध्ये विकसित केली गेली.

त्यात अनेक पातळ तारा आहेत. ऑप्टिकल फायबर केबल अशा प्रकारे डिझाइन केलेली आहे की ऑप्टिकल फायबरद्वारे डाटा ट्रांसफर प्रकाशाच्या वेगाने होतं. त्यामुळेच तुम्ही इंटरनेटद्वारे लाइव्ह व्हिडिओ पाहू शकता….

प्रश्न : विज्ञानाला इंग्रजीत Science का म्हटलं जातं ? 

उत्तर : सायन्स हा शब्द लॅटिन सायंटिया (scientia) या शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ ‘जाणून घेणे’ म्हणजेच विज्ञान म्हणजे नवीन विषयांची माहिती जाणून घेणे. म्हणूनच नवीन शोध लावणाऱ्या तज्ञांना शास्त्रज्ञ (Scientist) असं म्हटलं जातं.

आज आपण अशा भारतीय शास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचं नाव आहे ‘चंद्रशेखर वेंकटरमण’ ज्यांनी भौतिकशास्त्रा च्या (Physics) क्षेत्रात आपलेअमूल्य योगदान दिलं आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले आशियाई भारतीय आहेत.

त्यांच्या संशोधनात त्यांनी प्रतिबिंबित प्रकाशात इतर तरंगलांबीचे किरण देखील कसे उपस्थित आहेत हे पडताळून पाहिले. त्यांचे संशोधन रमण परिणाम म्हणून ओळखले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.