शेती शिवार टीम, 13 मे 2022 :- पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत लाभ घेतलेले अपात्र शेतकरी एका क्लिकवर स्वतः सरकारला पैसे परत करू शकतात. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाइटवर एक लिंक जोडली आहे ज्याद्वारे तुम्ही हे काम करू शकता. पीएम किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता जारी झाल्यानंतर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात या योजनेद्वारे अपात्र शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर शासनाने अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.त्यामुळे अपात्रांच्या यादीत तुमचा समावेश असेल, तर तुम्ही स्वतः या लिंकचा वापर करून पैसे परत करू शकता, अशी व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना मिळतात 6 हजार रुपये :-

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी योजना आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी दर चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातात.अशा परिस्थितीत अपात्र असलेले अनेक शेतकरीही त्याचा लाभ घेऊ लागले.ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच अशा अपात्र शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू केली.

पीएम किसान योजना : अपात्र शेतकऱ्यांना दिलेले पैसे परत करण्याची आली आहे वेळ :-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांची ओळख पटली असून त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.सध्या अशा शेतकऱ्यांकडून वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.त्याचवेळी बिहारसह अन्य काही राज्यांनी अशा अपात्र शेतकऱ्यांना हप्ता परत करण्यासाठी मुदत दिली आहे.याअंतर्गत राज्य सरकारने बँक खाते क्रमांकही जारी केला आहे.केंद्र सरकारने पीएम किसानच्या वेबसाइटवर ऑनलाइन रिफंडची लिंकही दिली आहे. याद्वारे तुम्ही पैसे परत करू शकता. आजपर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही ज्यामुळे अपात्र शेतकरी हे पैसे थेट केंद्र सरकारला परत करू शकतील. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने पीएम किसानच्या वेबसाइटवर ऑनलाइन रिफंड लिंक सुरू केली आहे जेणेकरून याद्वारे अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करता येतील.

ही ऑनलाइन रिफंड लिंक कसं काम करतं :-

पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन रिफंडच्या वेबसाइटवर दिलेल्या नवीन लिंकद्वारे पैसे परत करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-

1) सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
2) येथे फार्मर्स कॉर्नरवर तुम्हाला ऑनलाइन रिफंडची लिंक मिळेल.
3) आता तुम्हाला या लिंकवर क्लिक करावे लागेल.
4) या लिंकवर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होईल. यामध्ये ज्यांनी राज्य सरकारमार्फत पैसे परत केले आहेत आणि ज्यांनी अद्याप पैसे परत केले नाहीत त्यांच्यासाठी हे  पर्याय आहेत
5) जर तुम्ही पीएम किसानचे पैसे परत केले असतील, तर पहिले चेक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा, अन्यथा दुसरा पर्याय तपासा आणि सबमिट करा.
6) यानंतर आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका. इमेज टेक्स्ट कॉपी किव्हा टाइप करा आणि Get Data वर क्लिक करा.
7) जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला You are not eligible for any refund Amount हा मॅसेज येईल नाहीतर रिफ्ड अमाउंट शो करेल !

यूपी आणि महाराष्ट्र मध्ये पीएम किसान सन्मान निधीमध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे. आतापर्यंत तीन लाख 15 हजार 10 लाभार्थी तपासणी व पडताळणीत अपात्र आढळून आले आहेत. त्यांना दिलेली रक्कम वसूल केली जाईल.राज्यात आतापर्यंत 2.55 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.यापैकी 6.18 लाख शेतकरी असे आहेत की, डेटाबेसमधील आधार क्रमांक आणि आधार कार्डमध्ये टाकलेले नाव यात तफावत आहे.अशा लोकांना पुढचा हप्ता मिळणार नाही. काही डेटाबेसमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

PM Kisan Samman Nidhi Yojana : या शेतकऱ्यांना पैसे परत करावे लागतील :-

तुमच्या घरातील एकाच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य पीएम किसान अंतर्गत हप्ता घेत असतील तर हप्त्याचे पैसे परत करावे लागतील. कुटुंबातील फक्त एका सदस्याला हप्ता मिळण्याचा हक्क असेल, ज्याचे नाव फील्ड पेपरमध्ये असेल.

आपण हे अशा प्रकारे समजू शकतो की जर एकाच कुटुंबातील आई-वडील,पत्नी, मुलगा पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत सन्मान निधीचा हप्ता घेत असतील तर त्यांना पैसे परत करावे लागतील. नियमांनुसार, कुटुंबातील फक्त एक सदस्य पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेऊ शकतो.

पैसे परत न झाल्यास काय करावे ?

नोटीस दिल्यानंतरही तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे परत केले नाहीत तर नियमांनुसार तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि अशा प्रकरणात तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी अशा अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम लवकरात लवकर सरकारला परत करावी.

PM किसान सन्मान निधी योजनेतील नवीन नियम काय आहे :- 

सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत काही बदल केले आहेत. यानुसार, पीएम किसान सन्मान निधीचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्याला मिळेल, ज्याच्या नावावर शेताची कागदपत्रे असतील. म्हणजेच वडिलोपार्जित जमिनीत पूर्वीप्रमाणे वाटा असलेल्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या लोकांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही ? 

केंद्र सरकारने लहान आणि किरकोळ भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. यामध्ये अनेकांना योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे, ज्यांचा तपशील पुढीलप्रमाणे-

ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

तुम्ही सोडून तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतीयोग्य जमीन असल्यास तुम्हाला पीएम किसानचा लाभ दिला जाणार नाही.
शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कर भरल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर एखाद्या शेतकऱ्याने सरकारी नोकरी केली तर त्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक दहा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
याशिवाय नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *