Take a fresh look at your lifestyle.

10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ; स्टाफ सिलेक्शन कमिशनने 2,000 पेक्षा जास्त पदांची (SSC) भरती काढलीये….

0

शेती शिवार टीम, 13 मे 2022 :- सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने वेगवेगळ्या विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी निवड पोस्ट फेज-10 भर्ती अधिसूचना (SSC Phase 10 Selection Post 2022) जारी केली आहे. या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 2065 पदे भरली जाणार आहेत.

या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जून 2022 आहे आणि 15 जून 2022 पर्यंत ऑनलाइन शुल्क जमा करता येईल. यासोबतच 20 जून 2022 ते 26 जून 2022 या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

या भरतीमध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाच्या कार्यालयात डेटा प्रोसेसिंग असिस्टंट पदांची सर्वाधिक संख्या आहे. भरतीमध्ये डेटा प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड A च्या 133 पदे आहेत आणि या पदांव्यतिरिक्त लॅबोरेटरी अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), एक्झिक्युटिव्ह, मेडिकल अटेंडंट, पर्सनल असिस्टेंट इ. विविध पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता :-

या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना 10वी, 12वी आणि पदवीपर्यंतची पदवी असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

अर्ज फी :-

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. फी UPI, नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्डद्वारे भरली जाऊ शकते. महिला, एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही…

SSC Phase 10 Selection Post 2022 या स्टेप्स फॉलो करून करा अप्लाय….

स्टेप्स 1 – उमेदवारांनी प्रथम आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
स्टेप्स 2 – वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, एसएससी उमेदवार पोर्टलसाठी स्वतःची नोंदणी करा.
स्टेप्स 3 – लॉगिन करा आणि फेज 10 2022 च्या परीक्षेसाठी अर्ज करा.
स्टेप्स 4 – अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप्स 5 – तुमची अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
स्टेप्स 6 – फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या..

Leave A Reply

Your email address will not be published.