Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan scheme Latest Update : पीएम किसान सन्मान निधीत केला ‘हा’ सहावा बदल ; त्याशिवाय मिळणार नाही 10वा हप्ता…

0

शेतीशिवार टीम,13 डिसेंबर 2021:- PM Kisan 10th Installment : पीएम किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता आता 25 डिसेंबरपूर्वी येणार नाही असे दिसते. कारण, लाभार्थ्यांची स्थिती पाहता आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे दिसते. डिसेंबर-मार्चचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मोदी सरकारने अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. तसे, या महिन्यापर्यंत पीएम किसान योजनेत 5 बदल करण्यात आले होते. गेल्या आठवड्यातच यात आणखी एक बदल झाला आहे. या बदलांतर्गत आता शेतकऱ्यांना e-KYC करणे आवश्यक झाले आहे. आतापर्यंत काय बदल झाले ते जाणून घेऊया…

e-KYC अनिवार्य :-

सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) आधार अनिवार्य केलं आहे. पोर्टलवर आधार आधारित ओटीपी व्हेरिफिकेशन साठी किसान कॉर्नरमधील eKYC ऑप्शनवर क्लिक करा आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसे, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे साध्य करू शकता…

धारण मर्यादा ओव्हर :-

योजनेच्या सुरुवातीला केवळ तेच शेतकरी पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर शेती होती. आता 14.5 कोटी शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने ही सक्ती दूर केली आहे.

आधार कार्ड अनिवार्य :-

जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार. आधार कार्ड शिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने लाभार्थ्यांसाठी आधार अनिवार्य केलं आहे. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आधार. आधारशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने लाभार्थ्यांसाठी आधार अनिवार्य केलं आहे.

स्व – रजिस्ट्रेशन सुविधा :-

पीएम किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी मोदी सरकारने कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती संपवली आहे. आता शेतकरी घरी बसून रजिस्ट्रेशन करू शकतात. तुमच्याकडे खतौनी, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असल्यास, pmkisan.nic.in वर फार्मर्स कॉर्नरवर जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करा.

स्वतः स्थिती (Status) तपासण्याची सुविधा :-

सरकारने आणखी एक मोठा बदल केला आहे की, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमची स्थिती स्वतः तपासू शकता. जसे की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमच्या बँक खात्यात किती हप्ते आले आहे इ. आता पीएम किसान पोर्टलला भेट देऊन कोणताही शेतकरी त्याचा आधार क्रमांक, मोबाईल किंवा बँक खाते क्रमांक टाकून स्थितीची माहिती मिळवू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड आणि मानधन योजनेचे फायदे :-

आता किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील PM किसान योजनेशी जोडलं गेलं आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना KCC बनवणे सोपंझालं आहे. शेतकऱ्यांना KCC वर 4 % दराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तसेच पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही. या योजनेंतर्गत, शेतकरी पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान मिळवू शकतात.

10वा हप्ता कधी येणार :-

मोदी सरकारने गेल्या वेळी 25 डिसेंबर रोजी डिसेंबर – मार्चचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. आत्तापर्यंत लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये फक्त Rft Signed by State For 10nth Installment असं दिसत आहे. Rft म्हणजे Request For Transfer, म्हणजे ‘लाभार्थींच्या डेटाची राज्य सरकारने व्हेरिफिकेशन केलं असून, ती बरोबर असल्याचे आढळून आले आहे’. राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याची विनंती केली आहे.

म्हणजेच, यानंतर FTO जनरेट करावा लागणार आहे. ज्याचा फुल फॉर्म म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर. जर स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending आहे’ असा मेसेज दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा हप्ता तुमच्या बँक खात्यात लवकरच ट्रान्सफर केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.