शेतीशिवार टीम,12 डिसेंबर 2021:- CDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे कसं कोसळलं ? याचा शोध घेण्यासाठी ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू आहे.
दरम्यान, कोईम्बतूर पोलिसांनी बुधवारी निलगिरीमध्ये चालकाचा अपघात होण्यापूर्वी त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. या अपघातात CDS रावत, त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून मोबाईल फोन ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. फोनचा मालक कोईम्बतूरचा वेडिंग फोटोग्राफर आहे. हेलिकॉप्टर पडण्यापूर्वी 8 डिसेंबरला तो मित्रांसह निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी भागात गेला होता, त्याचा व्हिडिओ बनवला होता. त्या दिवशी तो मित्रांसोबत घनदाट जंगलात का गेला होता ? जंगल वन्य प्राण्यांमुळे प्रतिबंधित क्षेत्र आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
फुटेजमध्ये, IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर दाट धुक्यात अचानक गायब होतं. हेलिकॉप्टर पडल्याचाही मोठा आवाज येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी आयएएफने त्रि-सेवा न्यायालयाची स्थापना केली आहे.
जनरल रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्याशिवाय ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान, स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंग (को-पायलट), ज्युनियर वॉरंट ऑफिसर (जेडब्ल्यूओ) राणा प्रताप दास,
जेडब्ल्यू अरक्कल प्रदीप, लान्स ना. कुमार, लान्स नाईक बीएस तेजा, हवालदार सतपाल राय, नाईक गुरसेवक सिंग आणि नाईक जितेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावला, त्याला बेंगळुरूच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.