शेतीशिवार टीम,12 डिसेंबर 2021:- निरोगी आहार आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा असतो,कारण जर आपण पौष्टिक अन्न खाल्ले नाही तर आपण गंभीर आजारांना बळी पडू शकतो. म्हणूनच चांगला आहार हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवणे महत्त्वाचे आहे.
मात्र, असे दिसून येते की लोक त्यांच्या खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि ते घरचे अन्न सोडून बाहेरचे अन्न खाणे जास्तपसंत करतात. अशा परिस्थितीत ते अनेक वेळा आजारी देखील पडतात.
इतकंच नाही तर याशिवाय आणखी एक गोष्ट खूप पाहायला मिळते की लोक रात्रीचं जेवण काहीही खातात तसेच ते हे पण विसरतात की असे केल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते. म्हणूनच रात्रीच्या वेळी कोणत्या गोष्टींचे सेवन करू का नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…
सोडा हानी पोहोचवू शकतो :-
रात्रीच्या जेवणानंतर अन्न पचवण्यासाठी काही लोक सोडा पितात सामान्यतः असे पाहिले जातं. पण सोडा किंवा सोडा पावडर रात्री वापरल्यास पोट खराब होऊ शकते. त्यामुळे सोडा पिणे टाळणे हाच उत्तम पर्याय आहे.
कॉफी देखील योग्य नाही :-
रात्री कॉफी पिणे फायद्यायची नाही कारण यामुळे तुम्हाला झोप लवकर येत नाही . त्याच वेळी, जर तुम्ही दररोज असे केले तर तुम्हाला पुरेशी झोप मिळणार नाही आणि तुम्ही आजारी पडू शकता.कॉफीमधील कॅफिनमुळे शरीराला ताजेपणा मिळतो कॉफी नेहमी सकाळी घ्यावी .
पिझ्झा खाणे टाळावं :-
कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड आपल्या शरीरासाठी चांगले नसते, पण तरी रात्रीच्या वेळी पिझ्झा खाल्ल्यास तुम्हाला पोटचा त्रास होऊ शकतो. त्यात चीजचे प्रमाण जास्त असल्याने ते तुमचे पोटही खराब करू शकते.
संत्र्याचा रस :-
झोपण्यापूर्वी संत्र्याचा रस घेणे चांगले मानले जात नाही. रात्री झोपताना ते पचत नाही आणि शरीरात ऍसिड तयार होते. अशा स्थितीत रात्री ज्यूस पिण्याऐवजी थेट फळे खाऊ शकता.