Take a fresh look at your lifestyle.

चुकूनही दुधामध्ये तुळशीचा रस / पाने मिसळून पिऊ नका ; पण का ? वाचा…

0

शेतीशिवार टीम,13 डिसेंबर 2021:- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण दुधासोबत तुळशीचे पाने सेवन करतात. पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि दुधात तुळस मिसळून पिणे खरचं टाळावं. कारण तुळशीच्या चवीमध्ये तुरटपणा आणि तिखटपणा असतो. 

अशा स्थितीत याचे रोज सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र, दूध आणि तुळशीचे सेवन मर्यादित प्रमाणात करणेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तज्ज्ञांच्या मते तुळशीचे दुधासोबत सेवन करायचे असेल तर ते चहामध्ये घ्यावे. कारण, दुधात मिसळल्यानंतर तुळशीच्या घटकांमध्ये बदल होतो.यामुळे तुळशीमुळे दूध आम्लयुक्त बनते आणि ते आपल्या शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते.

दुधात तुळशीचे सेवन केल्याने होणारे नुकसान:-

1)ज्या लोकांचे रक्त पातळ आहे, त्यांनी दुधासोबत तुळशीचे सेवन कमी करावे, अन्यथा त्यांना रक्तस्रावाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

2)तुळशीचे दूध जास्त प्रमाणात सेवन केल्यास पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याचा धोका असतो.

3)मधुमेहाच्या रुग्णांनी तुळशीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

4)दुधात तुळस घालून पिणे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे ते पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.