Take a fresh look at your lifestyle.

व्हिडीओ : पक्षाला मतदान न केल्याने तालिबानी शिक्षा ; दलित युवकांना चाटायला लावली थुंकी…

0

शेतीशिवार टीम,12 डिसेंबर 2021 :- जगाला लोकशाहीचा मंत्र देणाऱ्या बिहारमधून अत्यंत लाजिरवाणं कृत्य समोर आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पंचायत निवडणुकीत पक्षाला मतदान न केल्याने महादलित समाजातील तरुणांना उठा – बशा काढून थुंकी चाटायला लावली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो कुटुंबा ब्लॉकच्या अंबा पोलीस स्टेशन हद्दीतील डुमरी पंचायतीच्या खरंती टोले भुईं बिघा येथे घडला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपी बलवंत कुमार याला अटक केली.

पंचायत निवडणुकीत मुख्याधिकारी पदासाठी मतदान न केल्याने मारहाणीचीही घटना घडल्याचे सांगण्यात आलं आहे. अनिल कुमार भुयान आणि मनजीत भुयान अशी या तरुणांची नावे आहेत.

व्हिडिओमध्ये या पंचायतीचे प्रमुख उमेदवार असलेले बलवंत कुमार तरुणांसमोर दिसत आहेत, जो त्यांना जबरदस्तीने बसवून थुंकी चाटायला लावत आहे. उठा – बशा दरम्यान तो त्यांना लाथ मारतानाही दिसून आला आहे. निवडणुकीत मतदान न केल्याने प्रमुख उमेदवाराने हा प्रकार केल्याने खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.