Take a fresh look at your lifestyle.

वर्षभरापूर्वी गावातच लग्न ; कार घेण्यासाठी सासरचा छळ, अन् अर्धनग्न अवस्थेत फॅनला लटकलेला मृतदेह…

0

महाअपडेट टीम,12 डिसेंबर 2021:- राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत असून अशीच कौटुंबिक हिंसाचाराची धक्कदायक अशी घटना श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला या ठिकाणी घडली आहे.

या ठिकाणी एका तरुण नवविवाहितेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परंतु तरुणीच्या भावाने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पूजा अतुल मोरे (वय २२, राहणार अरणगाव दुमाला श्रीगोंदा) असं मृत तरुणीचे नाव आहे. वर्षभरापूर्वी तरुणीचा प्रेमविवाह श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला गावातच अतुल बाळासाहेब मोरे याच्याशी 19 डिसेंबर 2020 रोजी झाला होता. परंतु सासरच्या मंडळींकडून कार घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपयांच्या मागणीसाठी तिचा वारंवार छळ होत होता.

तिने हा त्रास मयत पुजा माहेरी आईवडील व पती अतुल यांना तोंडी व मोबाईल मेसेज करुन सांगितला होता.दरम्यान दोन दिवसापूर्वीच पूजाचे वडील संजय दिवटे यांनी गावातील काही पंच म्हणून मध्यस्थी लोकांना घेऊन सासरच्या लोकांना समजूत काढली होती.

पूजाच्या वडिलांनी विनंती करून सुद्धा त्रास काही थांबला नाही. सासरी पूजाचा छळ सुरूच होता. अचानक 8 डिसेंबर रोजी घरात पूजाचा मृतदेह आढळून आला. फॅनला गळफास घेऊन पूजाने आत्महत्या केल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच पूजाचा भाऊ संदीप दिवटे आणि चुलत्यांनी घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

दुसऱ्या दिवशी पूजावर माहेरच्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पूजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सासरीची लोक हजर नव्हती. त्यामुळे पूजाच्या माहेरच्या लोकांना संशय बळावला.

त्यांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर बेलवंडी पोलिसांनी पती अतुल मोरे व सासरे बाळासाहेब मोरे, सासु वैशाली बाळासाहेब मोरे, ननंद मोहिणी मधूकर ढोले यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अतुल मोरे आणि सासरा बाळासाहेब मोरे याला अटक केली आहे.

माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही. तिला सासरच्या लोकांनी छळ करुण मारले व नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडून तिचा मृतदेह फासावर अर्धनग्न अवस्थेत लटकविला आहे, असा आरोप भाऊ संदिप दिवटे यांनी केला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलिस करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.