सरकार दर महिन्याला देणार 3000 रुपये ; पात्रता, कागदपत्रे, लाभ, कसा कराल अर्ज ?
शेतीशिवार टीम, 15 फेब्रुवारी 2022 : Shram Yogi Maandhan Yojana : श्रम योगी मानधन योजना (PMSYM) ही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. या योजनेच्या मदतीने देशातील मजुरांना सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते. 2019 मध्ये सरकारने श्रम योगी मानधन पेन्शन योजना (PM Shram Yogi Maandhan Yojana) सुरू केली होती.
eshram च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (25 जानेवारी 2022) या योजनेत 46 लाख 17 हजारांहून अधिक मजुरांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर चला जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर –
दरमहा मिळणार 3000 रुपये पेन्शन :-
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत (PM Shram Yogi Maandhan Yojana) देशातील 42 कोटी मजुरांना लाभ मिळणार आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात, त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल. वयाची ६० ओलांडल्यानंतरच कामगारांना पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, मजुरांना दरमहा 3,000 रुपये म्हणजे वार्षिक 36,000 रुपये मिळणार आहे.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना 2022 ची मुख्य तथ्ये :-
योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करेल.
लाभार्थीकडून मासिक प्रीमियम देखील LIC कार्यालयात जमा केला जाईल आणि योजना पूर्ण झाल्यावर, LIC कडूनच लाभार्थीला मासिक पेन्शन देखील प्रदान केले जाईल.
ही मासिक पेन्शन थेट बँक ट्रांसफरद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रांसफर केली जाईल.
जर तुम्हाला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेबद्दल अधिक माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही जवळच्या कोणत्याही भारतीय जीवन निगम कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा खाली दिलेल्या ऑनलाइन वेबसाइटला भेट देऊ शकता.
आकडेवारीनुसार, 30 जानेवारीपर्यंत सुमारे 4 कोटींहून अधिक लोकांनी या योजनेत रजिस्ट्रेशन केलं आहे.
प्रधानमंत्री मानधन योजनेची पात्रता –
वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
करदाते (Tax payers) या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
EPFO, NPS आणि ESIC अंतर्गत कव्हर नसलं पाहिजे.
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे :-
आधार कार्ड
ओळखपत्र
बँक पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्जदाराचा पूर्ण पत्ता
मोबाईल नंबर
कसा कराल अर्ज ? जाणून घ्या..
maandhan.in/shramyogi येथे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेत लॉग इन करा.
होम पेजवर, ‘Click here to apply now’ या लिंकवर क्लिक करा
त्यानंतर ‘Self Enrollment’ क्लिक करा.
तुमचा मोबाईल नंबर (Mobile number) एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.
आता तुम्हाला अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, कॅप्चा कोड भरल्यानंतर ओटीपी (OTP) मिळेल, तो भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट (Form submitted) केल्यानंतर प्रिंट काढून घ्या..
लाभ कोणी घ्यावा…
रस्त्यावरील विक्रेते, हेड लोडर्स, वीटभट्ट्या, मोची, चिंधी वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार इत्यादींनी लाभ घ्यावा…