Take a fresh look at your lifestyle.

PMMVY – प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना – 2022

0

शेतीशिवार टीम, 23 जानेवारी 2022 : गर्भधारणा सहाय्य योजना 2022 द्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरोदर महिलांना 6000 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जातं. बहुतेक जोडप्यांना या योजनेबद्दल फारशी माहिती नसते. यामध्ये आरोग्याशी संबंधित काळजी, गरोदर महिलेचं योग्य खानपान राहावं जेणेकरून गर्भवती महिला आणि स्तनदा महिला त्यांच्या बाळाचे कुपोषित होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि मृत्यू दर कमी रहावं. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

1 जानेवारी 2017 रोजी मा. नरेंद्र मोदीजीनी ही योजना चालू केली. या योजनेचं दुसर नाव प्रधानमंत्री गर्भावस्था मदत योजना असं आहे.या योजने विषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो. माहिती संपूर्ण वाचा आणि योजनेचा लाभ घ्या.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना पात्रता (कागदपत्रे) :-

गर्भधारणा सहाय्य योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गर्भवती महिलांचे वय 19 वर्षांपेक्षा कमी नसावं.
या योजनेंतर्गत, 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर गर्भवती झालेल्या महिलांना देखील पात्र मानलं जातं.
शिधापत्रिका
मुलाचे जन्म प्रमाणपत्र
दोन्ही पालकांचे आधार कार्ड
बँक खाते पासबुक
दोन्ही पालकांचे ओळखपत्र

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2022 मध्ये ऑनलाइन अर्ज कसा कराल ?

राज्यातील इच्छुक लाभार्थ्याने या योजनेंतर्गत ऑनलाइन करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात..

सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या ऑफिसियल वेबसाइट जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होम पेज (Home page) तुमच्यासमोर समोर उघडेल. या होम पेजवर तुम्हाला लॉगिन फॉर्म (Login form) दिसेल.

तुम्हाला या लॉगिन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की ईमेल आयडी, पासवर्ड कॅप्चा कोड इ. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉगिन (Login) बटणावर क्लिक करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर, तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

आता आपण ऑफलाईन अर्जाबद्दल जाणून घेऊयात…

या योजनेसाठी गर्भवती महिलांना अर्ज करण्यासाठी तीन फॉर्म (पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म) भरावा लागेल.

सर्वप्रथम गरोदर महिलांनी अंगणवाडी व जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणीसाठी पहिला फॉर्म भरावा व त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी.
यानंतर तुम्हाला अंगणवाडी आणि जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वेळोवेळी दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म भरून सबमिट करावा लागेल.

तिन्ही फॉर्म भरल्यानंतर अंगणवाडी आणि जवळचे आरोग्य केंद्र तुम्हाला स्लिप देईल अशा प्रकारे तुमचा ऑफलाइन अर्ज पूर्ण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.