केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी टपाल विभागामार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे . म्हणजेच आता प्रत्येक नागरिकांपर्यंत पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा लाभ पोहचवण्यासाठी पोस्ट खात्याचे पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक करणार आहेत.
आजच्या लेखात, आपण पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचे लाभ देण्यासाठी सुरू केलेल्या पोस्टल सेवेबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचा..
सर्वाना माहीत आहे की, पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना केंद्र सरकारने 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली होती. याचा फायदा भारतातील 1 कोटी घरांना होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्जदार डाक विभागाच्या पोस्टमनमार्फत त्यांच्या मोबाईलवर “QRT PM सूर्य घर” या ऍप्लिकेशनद्वारे नोंदणी सुरु झाली आहे.
अहमदनगर पोस्टल विभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक संदीप हदगल यांनी ग्राहकांना विशेष सुविधा देण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल उचलले असून यामध्ये पोस्टमन तुमच्या दारी जाऊन केंद्र सरकारच्या या लाभदायक योजनेचा लाभ मिळवून देणार आहे त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामात नागरिकांनी सहयोग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत छतावर सौर पॅनेल बसवण्यात येणार असून एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे.
प्रत्येक कुटुंबाला 1 किलोवॅट क्षमतेच्या प्लॅन्टसाठी 30 हजार रुपये आणि 2 किलोवॅट क्षमतेच्या प्लॅन्टसाठी 60 हजार रुपये आणि त्याहून अधिक 18 हजार रुपये प्रति किलोवॅटचे अनुदान मिळणार आहे, म्हणजे 3 कोलोवॅट ते 10 किलोवॅटपर्यंत 78 हजारांचे अनुदान मिळणार आहे.
1 कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज मिळाल्यानंतर 1 कोटी घरांना वर्षाला 15 हजार रुपये मिळतील. याचा थेट फायदा 5 ते 6 कोटी लोकांना होणार आहे.
ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेले डाक विभाग निःसंशयपणे ग्राहकांना दर्जेदार सुविधा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
नोंदणीसाठी पोस्टमन एक महिन्याच्या वीज बिलाच्या प्रतीसह त्यांच्या मोबाईलवरून नोंदणी करत आहेत. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत, तुम्हीही आत्ताच लगेचच तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस केंद्राशी संपर्क साधू शकता..
लातूर जिल्ह्यांत सोलारमधून 13 कोटी 37 लाख युनिटची वीज निर्मिती..
हरितऊर्जा निर्मितीला प्राधान्य देत घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि अतिरिक्त वीज निर्मिती झाली तर त्याची विक्री करायची या सोलार योजनेला ग्राहकांनी पसंती दिली आहे. जिल्हयातील 3 हजार 197 वीज ग्राहकांकडून जानेवारी महिन्यात 13 कोटी 37 लाख 591 युनीटच्या वीज निर्मितीचा टप्पा गाठला आहे.
ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते.
महावितरणने सूर्यघर सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा स्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजन्सीची नियुक्ती केली आहे. त्याची यादी ऑनलाईन – अर्जांची सोय महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वीज ग्राहकांचा फायदा व पर्यावरणला हातभार लावणाऱ्या या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर परिमंलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे..