65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी साहाय्य करण्याकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात प्रदान करणे हे या योजनेचे ध्येय व उदिष्ट आहे.

या योजनेंतर्गत पात्र वृद्ध लाभाथ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाव्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. त्यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर फोल्डींग बाँकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर….

त्याचबरोबर शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र,मनःस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. शासनातर्फे 100 % अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे 3 हजार रुपयाच्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येत असून, या योजनेंतर्गत ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक असेल, त्या व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.

तसेच आधारकार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वोकारार्ह असेल. लाभाच्या पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा विपीएल रेशनकार्ड म्हणजे (हे दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीचे रेशन कार्ड) किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत किंवा राज्य, केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात.

लाभाथ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखांच्या आत असावे, याबाबतचे लाभाथ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे महत्वाचे आहे. मागील 3 वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरीत झाल्यावर विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभाथ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील.

ही आहेत महत्त्वाची कागदपत्रे :- 

याकरिता आवश्यक कागदपत्रांमध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेची पासबुक झेरॉक्स,पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक आहे

ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा:-

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच नागरिकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथून याबाबत योग्य माहिती घ्यावी, असे आवाहन साहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *