Take a fresh look at your lifestyle.

Police Bharti 2022 : राज्यात 18,331 जागांसाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरु, पहा जिल्हानिहाय जागा, पात्रता, ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

0

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस कॉन्स्टेबलच्या 18 हजार 331 पदांच्या भरतीसाठी आज बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर भरतीचे नोटिफिकेशन लिंक डाउनलोड करू शकता अर्ज करण्यासाठी policerecruitment2022.mahait.org या भरती पोर्टलला भेट देऊ शकता.

राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीसमध्ये हजारो कॉन्स्टेबल पदांसाठी भरती अधिसूचना जारी करणार आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले होते की, राज्य पोलीस खात्यातील 8,000 कॉन्स्टेबलसाठी पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात 15,000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022 च्या अधिसूचनेमध्ये पहिल्या टप्प्यातील 8 हजार पदांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (गट- क) ची पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा फक्त policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच , ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, त्याची नांवे पुढीलप्रमाणे आहेत :-

पोलीस भरती : 2022 एकूण जागा :- 18331

पोलीस शिपाई – 14956
पोलीस शिपाई चालक – 2174
राज्य राखीव पोलीस शिपाई – 1201

वयाची अट : 30 नोव्हेंबर 2022 रोजी – [मागास प्रवर्ग : 05 वर्षे सूट ]

1. पोलीस शिपाई :- 18 ते 28 वर्षे .
2. चालक पोलीस शिपाई :- 19 ते 28 वर्षे .
3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई :- 18 ते 25 वर्षे .

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग : ₹ 450 / –
मागास प्रवर्ग : ₹ 350 / –

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022

जिल्हानिहाय पहा, पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पोलीस काँटेबलच्या जागा

युनिट क्रमांक

युनिट

पोस्ट क्रमांक

पोलीस कॉन्स्टेबल

ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर

1 बृहन्मुंबई 7076 994
2 ठाणे शहर 521 75
3 पुणे शहर 720 10
4 पिंपरी चिंचवड 216
5 मिरा भाईंदर 986
6 नागपूर शहर 308 121
7 नवी मुंबई 204
8 अमरावती शहर 20 21
9 सोलापूर शहर 98 73
10 लोहमार्ग मुंबई 620
11 ठाणे ग्रामीण 68 48
12 रायगड 272 06
13 पालघर 211 05
14 सिंधुदुर्ग 99 22
15 रत्नागिरी 131
16  नाशिक ग्रामीण 164 15
17 अहमदनगर 129 10
18 धुळे 42
19 कोल्हापूर 24
20 पुणे ग्रामीण 579 90
21  सातारा 145
22 सोलापूर ग्रामीण 26 28
23 औरंगाबाद ग्रामीण 39
24 नांदेड 155 30
25 परभणी 75
26 हिंगोली 21
27 नागपूर ग्रामीण 132 47
28 भंडारा 61 56
29 चंद्रपूर 194 81
30 वर्धा 90 36
31 गडचिरोली 348 160
32 गोंदिया 172 22
33 अमरावती ग्रामीण 156 41
34 अकोला 327 39
35 बुलढाणा 51
36 यवतमाळ 244 58
37 पुणे लोहमार्ग 124
38 रेल्वे औरंगाबाद 108
39 औरंगाबाद शहर 15
40 लातूर 29
41 वाशिम 14
42 लोहमार्ग नागपूर 28
राज्य राखीव पोलीस दल सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल
(SRPF)

पोस्ट क्रमांक

1 पुणे  SRPF 1 119
2 पुणे  SRPF 2 46
3 नागपूर SRPF 4 54
4 दौंड SRPF 5 71
5 धुळे SRPF 6 59
6 दौंड SRPF 7 110
7 मुंबई SRPF 8 75
8 सोलापूर SRPF 10 33
9 गोंदिया SRPF 15 40
10 कोल्हापूर SRPF 16 73
11 काटोल नागपूर SRPF 18 243
12 कुसडगाव अहमदनगर 19 278

 

पोलीस भरती : 2022 – ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने या लिंकवर भरायचा आहे – लिंक – policerecruitment2022.mahait.org

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.

सर्व आवश्यक पात्रता / अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.

फॉर्म भरण्यासाठी सविस्तर सूचना, भरती प्रक्रिया, गुण येथे दिल्या आहेत – policerecruitment2022.mahait.org ही PDF डाउनलोड करा.

फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.

वरील सर्प पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.