नमस्कार युवा मित्रांनो, महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती : 2023 चा लेखी पेपर 7 मे रोजी मुंबईतील विविध महाविद्यालय आणि शाळा यांच्यातील 215 केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्तामध्ये लेखी परीक्षा पार असून 19 मे रोजी तिचे रिझल्ट लागला असून भरतीसाठी 5 लाख 81 हजार उमेदवारांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचे आव्हान पार केल्यानंतर 7076 उमेदवारांची भावी पोलिस म्हणून निवड झाली आहे.
या घेण्यात आलेल्या पोलीस भरतीची प्रश्नसंच कोड C मधल्या पहिल्या 22 प्रश्न आणि त्याची सर्व उत्तरे प्रश्नांच्या शेवटी देण्यात आले आहे.
1 . एका घनाची बाजू 4 मीटर आहे. ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल?
A ) दोन पटीने ( B ) तीन पटीने ( C ) चार पटीने (D) आठ पटीने
2. नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे ?
A) भारत B) दक्षिण कोरिया C) जपान D) तैवान
3. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोणाची नेमणूक झाली.
(A) डॉ. राजेंद्रप्रसाद (B) टी. एन. शेषन C ) सुकुमार सेन (D) नीला सत्यनारायण
4. गटात न बसणारी संख्या ओळखा ? 61,63, 67,73,81, 91, 103, 101
A) 61 B) 81 C) 91 D) 101
5. मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तो कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A ) इचलकरंजी B) सांगली C) सातारा D) कोल्हापूर
6. “तु + कडे” या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रुप कसे होईल ?
A ) तुकडे C ) तूकडे B) तुझ्याकडे D) तुच्याकडे
7. खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे ?
A )10×3 + ( 5 + 2 ) B) 10×4 + ( 5-3 ) C) 8×4 + 3 D) (9×3) + 2
8. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून …… आकारला जातो .
A) IGST B) CGST C) SGST D) UTGST
9. शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरु केली.
A) गोरखपूर B) खेड़ा C) सोलापूर D) अमरावती
Police Bharti 2023 : या सर्व 22 प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी..
10. जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल?
A) उद्या B) आजनंतर दोन दिवसांनी C) परवा D) आजनंतर तीन दिवसांनी
11. महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे .
A ) पुस्तकांचे B) वनस्पतींचे C) आंब्यांचे D) किल्ल्यांचे
12. “हल्ली” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
A) क्षणिक B) राठ C) नंतर D) पूर्वी
13. 33, 34, 35, X, 37, 38, 39 या संख्यांची सरासरी 36 आहे तर X ची किंमत किती असेल ?
A) 40 B) 32 C) 42 D) 36
14. ‘(VARUNA) हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित आयोजित करण्यात येतो ?
A) फ्रांस नौदल B) अमेरिकन नौदल C) श्रीलंकन नौदल D) बांगलादेशी नौदल
15. जानेवारी 2023 मध्ये ‘ विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला ?
A) कोलकाता B) नवी दिल्ली C) मुंबई D) तेलंगाणा
16. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा – ACE , FHJ , KMO , ?
A ) BDF B ) PRT C ) WYT D ) UXZ
17. महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस आजी – आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे ?
A ) 10 जून B ) 10 जुलै C ) 10 सप्टेंबर ( D ) 10 ऑक्टोबर
18. ‘देव’ या शब्दाचे अनेकवचन पुढीलपैकी कोणते ?
A) देवा B) देव्या C) देवे D) देव
19. शुभम व अनिल यांना 3 : 5 या प्रमाणात 24 केळी वाटली , तर शुभमला मिळालेली केळी किती ?
A ) 8 B) 15 C) 12 D) 9
20. कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून ‘ चॅटजीपीटी ‘ हा रोबो ( यंत्रमानव ) .. या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला .
(A) ओपनएआय
B) ओपनपीएआय
C) ओपनफोरयू
D) ओपनक्यूआर
21. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ….येथे आहे .
A) नवी दिल्ली B) कोलकाता D) चेन्नई C) मुंबई
22) समसंबध ओळखा – मंगळवार : शनिवार :: चैत्र : ?
A ) वैशाख B) जेष्ठ C) श्रावण D) भाद्रपद