शेतीशिवार टीम : 15 जुलै 2022 :- भारताच्या ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस (India Post) च्या Savings Plans बचतीचे एक चांगलं साधन बनलं आहे. हे देशातील कमी विकसित भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक पोस्ट ऑफिस बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त आहेत आणि जबरदस्त रिटर्न्स देतात. तसेच तुमचे भविष्य सुरक्षित करतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांचा सर्वात मोठा लाभ म्हणजे या योजनेतून सरकार कोणताही टॅक्स, GST घेत नाही…
पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राम सुरक्षा योजनेचाही समावेश आहे.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) काय आहे ?
योजना ही संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे, ज्यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाल्यावर एंडोमेंट अश्युरन्स पॉलिसी (Endowment Assurance Policy) मध्ये रूपांतरित करण्याचे फीचर्स समाविष्ट आहे. या अंतर्गत, पॉलिसीधारक 55, 58 किंवा 60 वर्षे वयापर्यंत प्रीमियम भरून जास्तीत जास्त लाभ मिळवू शकतात…
या योजनेचे ठळक मुद्दे पाहूया :-
19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो.
यामध्ये, किमान विमा रक्कम 10,000 रुपये आहे, तर कमाल 10 लाख रुपये आहे.
यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी अनेक ऑप्शन ही दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ते भरू शकतात.
चार वर्षांनंतर कर्जाची सुविधा :-
तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारक पॉलिसी सरेंडर करू शकतो.
तुम्ही 5 वर्षापूर्वीच सरेंडर केल्यास योजनेत बोनस मिळणार नाही..
शेवटचा जाहीर केलेला बोनस :- प्रति वर्ष प्रति 1,000 रुपये सम एश्योर्ड वर 60 रुपये मिळेल.
दररोज फक्त 50 रुपये करा जमा, तुम्हाला मिळतील तब्बल 35 लाख रुपये :-
ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला फक्त 50 रुपयांच्या रोजच्या ठेवीवर 35 लाख रुपयांचा रिटर्न्स मिळू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला पॉलिसीमध्ये 1,515 रुपये जमा केले आणि जर 10 लाख रुपयांची पॉलिसी असेल तर त्याला मॅच्युरिटीवर 34.60 लाख रुपये मिळतील.
गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 31,60,000 रुपये, 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 33,40,000 रुपये आणि 60 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 34.60 लाख रुपये मिळतील.