शेतीशिवार टीम : 15 जुलै 2022 :- मारुतीच्या ऑल न्यू ग्रँड विटाराच्या (Grand Vitara) लॉन्चचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. कंपनी 20 जुलै रोजी ही सर्वात आलिशान SUV लाँच करणार आहे. मारुतीने आतापर्यंत दोन टीझर रिलीज केले आहेत. पहिल्या टीझरमध्ये, जिथे नावाने सस्पेन्स संपवला. तर दुसऱ्या टीझरमध्ये त्याच्या फ्रंट लूकची झलक दाखवण्यात आली. लॉन्चच्या अगोदर, ग्रँड विटाराचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस डिटेल्स लीक झाले आहेत.
अशा परिस्थितीत आता एका वेबसाइटने त्याची किंमत जाहीर केली आहे. Rushlane च्या रिपोर्टनुसार, CarPrice नावाच्या वेबसाइटच्या सोर्स कोडमध्ये ग्रँड विटाराच्या किंमतीचा उल्लेख आहे. विशेष बाब म्हणजे ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) आणि किया सेल्टोसच्या (Kia Seltos) तुलनेत हे स्वस्त आहे.
मारुती Grand Vitara ची ओपनिंग प्राईझ :-
मारुतीने ग्रँड विटाराची बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक 11,000 रुपये टोकन रक्कम भरून ही SUV तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन बुक करू शकतात. त्याची ऑफलाइन बुकिंग नेक्साच्या शोरूममध्ये केली जाईल. मात्र, आतापर्यंत कंपनीने त्याची किंमत जाहीर केलेली नव्हती. त्याची किंमत 20 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, CarPrice वेबसाइटने त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये दिली आहे.आता ग्रँड विटाराची ही किंमत योग्य मानली तर ती क्रेटा आणि सेल्टोसपेक्षा स्वस्त ठरते…
Grand Vitara चे एक्सटीरियर, इंटीरियर, इंजन आणि सेफ्टी फीचर्स (एक्सपेक्टेड)
एक्सटीरियर (Exterior) : –
मारुतीची नवीन विटारा ब्रेझा ही टोयोटा हायरायडर (Toyota Urban Cruiser Hyryder) प्लॅटफॉर्म बेस्ड आहे, परंतु एक्सटीरियरच्या बाबतीत ती खूप वेगळी असेल. याचे फ्रंट-एंड आणि मागील डिझाइन वेगळे असेल. त्याच्या पुढच्या भागात नवीन डिझाइन केलेली ग्रिल उपलब्ध असेल. ज्याला अगदी नवीन बंपरसह जोडण्यात आले आहे. समोरच्या बाजूला अनेक वेगवेगळे एलईडी लाईट्स यात दिसतील. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा आकारही मोठा असेल. याची थेट स्पर्धा Hyundai Creta आणि Kia Seltos शी होईल, असे मानले जात आहे.
इंटिरिअर (Interior) :-
Vitaraचे इंटिरिअर देखील नवीन अपहोल्स्ट्रीसह पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलं गेलं आहेत. Hyryder प्रमाणे, Vitara मध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले मिळेल. Vitara UHD, वेंटिलोएटेड सिट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह 360 डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स उपलब्ध असतील. त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ (Panoramic sunroof) देखील असणार आहे. फीचर्सच्या बाबतीत ते टोयोटा हायरायडरसारखे असू शकते. मारुतीची ही नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही असेल असं मानलं जातं.
इंजिन :-
मारुती सुझुकीची नवीन विटारा हायब्रीड आणि सौम्य हायब्रिड इंजिनमध्ये लॉन्च केली जाईल. यात टोयोटाच्या 1.5L TNGA पेट्रोल युनिटसह 1.5L K15C DualJet पेट्रोल युनिट मिळेल. जे माइल्ड हाइब्रिड टेक्नोलॉजीने सुसज्ज असेल. या एसयूव्हीला 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन मिळेल. या SUV चे मॅन्युअल व्हेरियंट ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमसह दिलं जाऊ शकतं.
सेफ्टी फीचर्स :-
नवीन Vitara मध्ये वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अडजस्टेबल ड्रायव्हर सीटर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यासारखे स्टॅंडर्ड फीचर्स मिळतील. याशिवाय, सेफ्टीसाठी, यामध्ये मल्टिपल एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, ईएसई, हिल होल्ड असिस्ट, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट, पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा यासह अनेक सेफ्टी फीचर्स पहायला मिळतील. असं मानलं जातं की, त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.