शेतीशिवार टीम, 5 डिसेंबर 2021 : एफडी (FD) ही सुरक्षित गुंतवणूक आहे. जिथे छोटीशी गुंतवणूक करूनही तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. यामुळेच येथे मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करतात.
पण कोरोनामुळे बँक एफडीच्या दरात (Bank FD Rate) कपात करण्यात आली. त्यामुळे पोस्ट ऑफिस एफडी (Post Office FD) हा बँक एफडीपेक्षा गुंतवणूकचा चांगला पर्याय ठरू शकतो….
तज्ञांच्या मते, यावेळी बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे फार फायदेशीर नाही. कारण महागाईचा दर त्यापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस एफडीसाठी हा चांगला पर्याय आहे. जिथे तुम्हाला एक वर्ष, दोन वर्षे आणि 3 वर्षांच्या FD वर 5.5 % व्याजदर मिळू शकतो.
टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट जितेंद्र सोळंकी यांचं म्हणणं आहे की, जे अशे लोक आहेत की, ते कमी रिस्क घेऊन इमरजेंसी परिस्थितीत त्यांचा निधी वापरू इच्छितात त्यांच्यासाठी FD हा एक चांगला पर्याय आहे.
Covid-19 च्या संकटामुळे बँक एफडीच्या (Bank FD) दरांमध्ये घट झाली होती. त्याच वेळी, पोस्ट ऑफिस एफडी दर 5.5% ते 6.7% पर्यंत वाढवला आहे.
पोस्ट ऑफिस फिक्स डिपाॅजिट रेट्स (मुदत ठेव दर ) :-
पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही व्यक्ती 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी FD उघडू शकते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षांच्या एफडीवर 5.5% व्याज मिळेल. तर, 5 वर्षांच्या FD वर 6.7% व्याज मिळेल. ya yojnet या योजनेत सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, एखादी व्यक्ती त्यात 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकते.