राज्यातील तरुणांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे.
या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (SRPF) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.
ही जाहिरात प्रसिदध करण्यासंबंधीची तारीख पुढील आठवड्यात कळविण्यात येणार आहे, असे पोलिस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार यांनी कळविले आहे.
आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये.
त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.
पहा जिल्हानिहाय कुठे किती जागा भरल्या जाणार. . .
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा ?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926
इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956
पात्रता :-
12 पास
महिला उंची :- 155 सेंमी
पुरुष उंची :- 165 सेंमी
उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष शिथिल)
मैदानी परीक्षेचं कसं असणार स्वरूप :-
मैदानी चाचणीमध्ये पहिल्यांदा धावणे, गोळाफेक, त्याचबरोबर 100 मीटर धावणे, असं या मैदानी चाचणीचे स्वरूप असणार आहे.
पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-
शारीरिक चाचणी (50 गुण) :-
जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे
आवश्यक असेल.
(1) पुरुष उमेदवार गुण
(i) 1600 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण
एकूण :- 50 गुण
महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी :-
(i) 800 मीटर धावणे :- 20 गुण
(ii) 100 मीटर धावणे :- 15 गुण
(iii) गोळाफेक :- 15 गुण
एकूण :- 50 गुण
लेखी चाचणी (100 गुण) :-
() शारीरिक योग्यता चाचणी मध्येकिमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1 : 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
लेखी चाचणीमध्ये खालील विषय असणार समाविष्ट :-
(1) अंकगणित ;
(2) सामान्य ज्ञान व चालूघडामोडी
(3) बुध्दीमत्ता चाचणी ;
(4) मराठी व्याकरण.
लेखी चाचणीमध्येविचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल.
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे इतका असेल.
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्येकिमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40%
पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
संपूर्ण नवीन GR वाचनासाठी – येथे क्लिक करा