शेतीशिवार टीम, 17 फेब्रुवारी 2022 : प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Yojana) ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. याअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाते. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकीच ही योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे…
आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan) लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने 10 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केले आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती 11व्या हप्त्याची… मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच शेतकऱ्यांना हे गिफ्ट मिळणार आहे.
केंद्र सरकार पुढील म्हणजे 11व्या हप्ता हा एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांना पाठवू शकते. अहवालानुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवते. अशा प्रकारे एकूण तीन हप्त्यांमधून दरवर्षी सहा हजार रुपये ट्रान्सफर केले जातात.
1 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे 10 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पाठवले होते. यामध्ये शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये पाठवण्यात आले. अशा परिस्थितीत आता पुढील हप्ता एप्रिल महिन्यात येऊ शकतो.
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला तुमचा पुढील हप्ता कोणत्याही त्रासाशिवाय हवा असेल, तर लवकरात लवकर तुम्हाला (e-KYC) पूर्ण करावं लागणार आहे. सर्व शेतकरी लाभार्थ्यांना 31 मार्च 2022 पूर्वी (e-KYC) पूर्ण करण्यास सांगितले आहे, जेणेकरून 11 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात सहजपणे ट्रान्सफर करता येईल.
(e-KYC) करणं काही दिवसांसाठी होल्डवर होतं, पण आता ते पोर्टलवर ओपन करण्यात आलं आहे. मोदी सरकारने पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) आधार अनिवार्य केलं आहे.
पोर्टलवर आधार आधारित OTP प्रमाणीकरणासाठी (Authentication) किसान कॉर्नरमधील eKYC ऑप्शनवर क्लिक करा. आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी (Authentication) जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. तसं, तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने हे साध्य करू शकता…
यासाठी तुम्ही प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा…
उजव्या बाजूला तुम्हाला असे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला eKYC लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता तुमचा आधार क्रमांक( Aadhaar) आणि इमेज कोड (Image code) टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि OTP टाका.
जर सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल..