Take a fresh look at your lifestyle.

Agricultural Business Idea : निलगिरीची लागवड करा अन् मिळवा तब्बल 60 लाखांचा नफा !

0

शेतीशिवार टीम, 27 फेब्रुवारी 2022 : निलगिरी म्हणजे यूकेलिप्टस (Eucalyptus) सफेडा हे मिर्टेसी प्रजातीचं एक अतिशय उंच झाड आहे. या प्रजातीचे सुमारे 600 प्रजाती आढळतात, ज्या बहुतेक ऑस्ट्रेलिया (Australia) आणि तस्मानियामध्ये (Tasmania) आढळतात. युकॅलिप्टस रेगेन्स (Eucalyptus rangness) ही या प्रजातींमध्ये सर्वात उंच प्रजाती आहे, ज्याची झाडे 322 फूट उंच वाढतात. याच्या उपयुक्ततेमुळे, निलगिरी आता अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि भारतात विपुल प्रमाणात उगवली जात आहे.

भारतात, त्याची लागवड प्रामुख्याने आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकात केली जाते. त्याची योग्य पद्धतीने लागवड केल्यास पाच वर्षांत सुमारे 50 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. आज आपण या लेखाच्या माध्‍यमातून निलगिरीच्या लागवडीची माहिती शेतक-यां पर्यंत पोहावणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…

नीलगिरीचे नेमक्स काय आहेत उपयोग / फायदे :-

निलगिरीच्या झाडापासून चांगल्या दर्जाचे लाकूड मिळतं, ज्याचा उपयोग जहाजे, लाकडाचे खांब व फर्निचर बनवण्यासाठी केला जातो. निलगिरीच्या पानांपासून पटकन उडणार तेलं म्हणजे यूकेलिप्टस तेल (Eucalyptus oil) काढलं जातं. जे घसा, नाक आणि पोट किंवा सर्दी या आजारांवर औषध म्हणून वापरलं जाते. या झाडापासून एक प्रकारचा डिंकही मिळतो. नीलगिरीच्या झाडांची साल कागद बनवण्यासाठी आणि चामडे बनवण्यासाठी वापरली जाते.

निलगिरीची लागवड कशी कराल ?

निलगिरीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. ही वनस्पती बियाणे आणि कलम दोन्हीपासून उगवता येते. त्याची झाडे खूप उंच असल्याने ती अनेकदा कलम करून जमिनीत लावली जातात. रोपाच्या योग्य वाढीसाठी त्यांना पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी आवश्यक असते.

निलगिरीच्या लागवडीसाठी हवामान आणि जमीन कशी असावी ?

निलगिरीची झाडे सामान्य माती आणि हवामानात वाढतात. यासाठी 30-35 अंश तापमान आवश्यक असतं. त्यासाठी चांगल्या पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. यासाठी निलगिरीच्या शेतात पाणी साचणे चांगले ठरतं नाही. सेंद्रिय घटकांनी समृद्ध असलेल्या चिकणमाती जमिनीत निलगिरीची लागवड सर्वात योग्य मानली जाते. तर, पाणी शोषून घेणारी, क्षारयुक्त आणि खारट जमीन निलगिरीच्या उत्पादनासाठी खराब मानली जाते.

आता आपण निलगिरीच्या जाती पाहू…

निलगिरीच्या प्रामुख्याने 6 प्रजाती भारतात आढळतात. ज्याची कमाल उंची 80 मीटर पर्यंत आहे. या जातींमध्ये युकॅलिप्टस ऑब्लिव्हका, युकॅलिप्टस डेलेगेटेन्सिस, युकॅलिप्टस डायव्हर्सिकलर, युकॅलिप्टस नायटेन्स, युकॅलिप्टस ग्लोब्युल्स आणि युकॅलिप्टस विमिनालिस यांचा समावेश होतो.

 

निलगिरीच्या लागवडीसाठी शेतीची तयारी कशी कराल ?

निलगिरीच्या लागवडीसाठी शेत तयार करताना सर्वप्रथम नांगर यंत्राच्या साहाय्याने शेताची खोल नांगरणी करावी. यानंतर शेतात कल्टीवेटर चालवा आणि दोन तिरकी नांगरणी फिरवा. यानंतर, शेतात पाटा चालवून शेत समतल करा. शेत समतल झाल्यानंतर, ओळीत 5 फूट अंतरावर एक फूट रुंदीचे आणि खोलीचे खड्डे तयार करा. प्रत्येक रांगेत 5 ते 6 फुटांचं अंतर ठेवा. हे खड्डे लागवडीपूर्वी सुमारे 20 दिवस आधीच तयार करून ठेवावेत….

निलगिरीच्या लागवडीसाठी खते आणि फवारणी…

निलगिरीचे रोप शेतात लावण्यापूर्वी खड्ड्यात योग्य प्रमाणात शेणखत टाकून ते जमिनीत मिसळावे. याशिवाय या खड्ड्यांमध्ये 200 ग्रॅम एन.पी.के. (N.P.K). प्रमाण घातल्यानंतर ते जमिनीत मिसळून खड्ड्यांत पाणी द्यावं…

निलगिरीची रोपवाटिका कशी तयार कराल ?

निलगिरीची रोपे परिपक्व होण्यास वेळ लागतो, म्हणून प्रथम रोपवाटिका तयार केली जाते आणि नंतर एक वर्षानंतर ती शेतात लावता येते. रोपवाटिकांमध्ये निलगिरीचे रोपटे तयार करण्यासाठी पॉलिथिनमध्ये त्याच्या बिया वाढवल्या जातात. ज्यामध्ये शेणमिश्रित माती भरली जाते. त्याची रोपे 5 ते 6 महिन्यांत लावण्यासाठी तयार होतात. परंतु शेतात तर एक वर्षाचे रोपटचं लावावं…

निलगिरी लागवडीची योग्य वेळ कोणती…

निलगिरीच्या लागवडीसाठी योग्य कालावधी हा जून ते ऑक्टोबर हा आहे…

निलगिरीच्या लागवडीसोबत तुम्ही शेतात कोणतं आंतरपीक पिके घेऊ शकता ?

सुरुवातीला निलगिरीच्या वावरत आंतरपिकेही घेता येतात. आंतरपीक घेताना, अंतर 4X2 मीटर (अंदाजे 600) किंवा 6X1.5 किंवा 8X1 मीटर असावे. हळद आणि आले यांसारखी पिके किंवा औषधी वनस्पती आंतरपीक म्हणून लावता येतात. तसे, 72 X 2 मीटरचे अंतर बहुतेक त्याच्या लागवडीसाठी वापरले जाते.

निलगिरी लागवडीमध्ये तण नियंत्रण कसं ठेवाल ?

सुरुवातीच्या काळात शेत तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळोवेळी खुरपणी करत राहावं. त्यासाठी दोन ते तीन वेळा खुरपणी ची गरज आहे.

निलगिरी लागवडीमध्ये सिंचन कसं ठेवाल ?

पेरणीनंतर लगेच शेताला पाणी द्यावे. पावसाळ्यात सिंचनाची गरज भासत नाही, परंतु पावसाळा उशिरा आला किंवा चांगले झाले नाही तर सुरक्षित सिंचन द्यावे. निलगिरी हे दुष्काळ सहन करणारे पीक आहे, परंतु योग्य उत्पादनासाठी संपूर्ण वाढीच्या काळात एकूण 25 सिंचन आवश्यक आहेत. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता असते…

निलगिरीच्या वनस्पतीची काळजी कशी घ्याल ?

निलगिरीचे रोप लावल्यानंतर त्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. इतर झाडांप्रमाणे, निलगिरीला कीटक आणि रोगांचा धोका असतो. त्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाय योजले पाहिजेत जेणेकरून त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार नाही…

दीमक नावाच्या कीटकांपासून निलगिरीच्या वनस्पतीचे संरक्षण कसे कराल ?

दीमक हा नवीन रोपासाठी एक अतिशय गंभीर कीटक आहे, ज्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नव्या पानांना आरपार बिळं पडतात. पिकाचे दीमकांपासून संरक्षण करण्यासाठी निंबीसाईड 2 ML.घेऊन प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी….

ढेकूळ रोग :-

या रोगात झाडाची पाने सुकू लागतात, वाढ खुंटते आणि देठाची वाढही खराब होते. या रोगामुळे खराब झालेल्या पानांची वाढ थांबते. प्रादुर्भाव दिसल्यास झाड काढून टाकावे. नेहमी प्रतिरोधक रोपेच लावा…

निलगिरी लागवडीतून तुम्ही किती पैसा कमवाल :-

निलगिरीच्या लागवडीला फारसा खर्च येत नाही. एका हेक्टरमध्ये सुमारे तीन हजार रोपांची लागवड आरामशीर करता येते. ही रोपे नर्सरीमध्ये 7-8 रूपये रुपयाला मिळतात. अशा स्थितीत त्यांच्या खरेदीवर सुमारे 21 हजार रुपये खर्च होतात. इतर खर्चाचाही समावेश केल्यास सुमारे 25 हजार रुपये खर्च होतील. 4 ते 5 वर्षांनंतर प्रत्येक झाडापासून सुमारे 400 किलो लाकूड मिळतं. म्हणजेच 3000 झाडांपासून सुमारे 12,00,000 किलो लाकूड उपलब्ध होणार आहे. हे लाकूड बाजारात सहा रुपये किलो दराने विकले जातं. अशा परिस्थितीत तुम्ही ते विकून सुमारे 72 लाख रुपये कमवू शकता. जर इतर काही खर्च काढला तर निलगिरीच्या लागवडीतून तुम्ही 4 ते 5 वर्षात किमान लाख रुपये कमवू शकता….

जर तुम्हाला indiamart वरून रोपे मागवायचे असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा….

https://www.indiamart.com/proddetail/eucalyptus-plant-10494991248.html

Leave A Reply

Your email address will not be published.