शेतीशिवार टीम, 17 फेब्रुवारी 2022 : भारतात प्राचीन काळापासून शेतीसह पशुपालन केलं जात आहे. आजही शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून उत्पन्न वाढवत आहेत. अशा स्थितीत पशुपालक शेतकऱ्यांची सर्वात मोठी अडचण ही आहे की, त्यांच्या गायी, म्हशी ही जनावरे कमी दूध देतात. अनेक वेळा असे दिसून येते की, दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी पशुपालक आपल्या दुधारू गायी, म्हशींना इंजेक्शन देतात,त्यामुळे ते अधिक दूध देऊ लागतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे की, असे केल्याने केवळ जनावरांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर असे दूध सेवन करणे नागरिकांसाठीही घातक ठरू शकतं.
आज आपण जाणून घेणार आहोत की, गायी, म्हैस या दुधारू जनावरांचे दूध नैसर्गिक आणि घरगुती औषधी पद्धतीने कसे वाढवता येते जेणेकरून ते प्राणी स्वतःहून अधिक दूध देण्यास सुरुवात करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया शेतीशिवार च्या माध्यमातून गाय, म्हशीचे दूध वाढवण्याचे घरगुती तीन सोपे उपाय…
गाई म्हशींना दूध वाढवणारी इंजेक्शने दिल्याने काय होऊ शकतं, वाचा…
बरेच पशुपालक आपल्या गायी आणि म्हशींपासून अधिक दूध मिळविण्यासाठी इंजेक्शन सप्लिमेंटचा अवलंब करतात, ते सुरुवातीला प्रभावी असल्याचं सिद्ध होतं, परंतु, काहीवेळा नंतरत्याचा परिणाम उलट देखील होतो. अधिकाधिक दूध काढण्यासाठी गाई-म्हशींना ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिलं जातं. या दुधाचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. ऑक्सिटोसिनच्या (Oxytocin) इंजेक्शनवर बंदी असतानाही त्याचा वापर गायी आणि म्हशींमध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो.
अशा परिस्थितीत, इंजेक्शन आणि विक्रेता दोघांनाही दंड आणि शिक्षा होऊ शकते. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने अशा इंजेक्शनची खेप अनेकवेळा पकडली असून त्यावर शिक्षेची व दंडाची तरतूद आहे. असं मानलं जातं की, दूध देऊनही, गायी आणि म्हशी त्यांच्या पिलांसाठी सुमारे 25% बचत करतात. परंतु, इंजेक्शन देऊन दूधही बाहेर काढलं जातं जे अत्यंत धोकादायक आहे.
आता पाहूया दूध वाढवण्याचे नैसर्गिक सोपे उपाय :-
गाय आणि म्हशीचे दूध वाढवण्यासाठी आपण नेहमी नुकसान रहित उपाय केले पाहिजेत जेणेकरून जनावरांच्या आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही आणि दूध देखील अधिक प्रमाणात मिळतं. अशा उपायांचा अवलंब केल्यास दर्जेदार दूध अधिक प्रमाणात मिळू शकते. यासाठी गाय किंवा म्हशीच्या आहाराकडेही लक्ष ददेणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांची देखभाल आणि काळजी याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
1. चवळीचा पाला खाल्ल्याने वाढतं गाय आणि म्हशीचे दूध…
पशुसंवर्धन विभागाच्या म्हणण्यानुसार, चवळीचा पाला खाल्ल्याने गाईचे दूध वाढतं. चवळीच्या पाल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते. चवळीचा पाला खाल्ल्याने गाईच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही आणि दुधाचे प्रमाणही सहज वाढते. चवळीच्या पाल्यामध्ये काही वैशिष्ट्ये आढळतात, त्यामुळे ते गाई आणि म्हशींना खाऊ घालणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
चवळी गवताचे वैशिष्ट्य म्हणजे हे गवत इतर गवतांपेक्षा पटकन पचणारे असतं. त्यात प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात आहे जे दुग्धजन्य प्राण्यांसाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी गाई आणि म्हशींना चवळीचापाला खाऊ घातल्यास ते नैसर्गिकरित्या दुधाचे प्रमाण वाढवू शकतात…
#DYK 🐮 | Cowpea fodder supports a daily 6-7 Kg milk yield/cow without using any concentrate supplements!#AnimalHealth #AnimalWealth #Fodder #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/dpLrDwin63
— Dept of Animal Husbandry & Dairying, Min of FAH&D (@Dept_of_AHD) September 23, 2021
2. गाय आणि म्हशीचे दूध वाढवण्यासाठी बनवा घरगुती औषध ..
गाय आणि म्हशीच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही त्याचे औषध घरीच बनवू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता असेल ज्या तुम्हाला सहज उपलब्ध होतील. औषध तयार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे..
हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला 250 ग्रॅम गव्हाची लापशी (गव्हाचा तुटलेला भाग) ,100 ग्रॅम गुळाचा रस, 50 ग्रॅम मेथी दाणे, एक फुल कच्च खोबरं , 25-25 ग्रॅम जिरे आणि ओवा लागतील…
कसा कराला यांचा USE…
सर्व प्रथम गव्हाची लापशी, मेथी दाणे आणि गूळ शिजवून घ्या. यानंतर खोबरे बारीक करून त्यात टाकावे. ते थंड झाल्यावर जनावरांना खायला द्या..
हे घटक फक्त सकाळी अनुषापोटी महिनाभर खायला द्या.
गाभण गायीला वासरू होण्याच्या एक महिना अगोदर ते सुरू करावे आणि वासरू झाल्यानंतर 1 महिन्यापर्यंत खायला द्या
25-25 ग्रॅम ओवा आणि जिरे गायीला वासरू झाल्यानंतर 3 दिवसांनी द्यावेत. असे केल्याने तुम्हाला लवकरच चांगले परिणाम मिळू लागतील…
गाईला वासरू झाल्यानंतर 21 दिवस सामान्य आहार द्यावा.
गाईचे वासरू 3 महिन्यांचे झाल्यावर किंवा गाईचे दूध कमी झाल्यावर गाईला दररोज 30 ग्रॅम जवसाचे औषध पाजावे, त्यामुळे दूध कमी होणार नाही…
3. मोहरीचे तेल आणि पिठापासून बनवा दूध वाढवण्याचे औषध..
सर्व प्रथम, 200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 250 ग्रॅम गव्हाचे पीठ घ्या.
आता दोन्ही एकत्र करून संध्याकाळच्या वेळी जनावरांना चारा व पाणी देऊन खायला द्या.
औषध खाल्ल्यानंतर जनावराला पाणी देऊ नये हे लक्षात ठेवा.
एवढेच नाही तर हे औषध पाण्यासोबतही देऊ नये. अन्यथा जनावराला खोकल्याची समस्या येऊ शकते.
हे औषध फक्त 7-8 दिवस जनावरांना खायला द्या, त्यानंतर हे औषध बंद करावे. त्याचबरोबर जनावरांना हिरवा चारा आपण आधीच देत असलेला डोस चालू ठेवावा. तो बंद होता कामा नये…
दुधारु गायी, म्हशींची देखभाल कशी कराल ?
वरील घरगुती उपायांव्यतिरिक्त पशुपालकांनी दुधारु गायी, म्हशींची योग्य देखभाल व निगा राखण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. तसेच दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
दुभत्या गायी, म्हशी, गाई यांचे निवासस्थान स्वच्छ असावे, त्यामध्ये प्रकाश व हवेची योग्य व्यवस्था असावी.
जनावरांसाठी पावसाळ्यात आरामात बसू शकेल अशी पक्की जागाही असावी.
प्राण्यांसाठी विशेष घर आणि खाद्य क्षेत्र तुलनेने उंच आणि पातळीचे असावे.
उन्हाळ्यात जनावरांसाठी पंखे किंवा कुलरची सोय ठेवावी जेणेकरून जनावरांना उष्णतेपासून आराम मिळेल.
जनावरांना हिरवा चारा खायला हवा. त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते.
जनावराचे लसीकरण वेळोवेळी करावे जेणेकरुन जनावर लवकर रोगाला बळी पडू नये.
जनावरांना कधीही उघड्यावर सोडू नये. उघड्यावर सोडल्यास प्राणी इकडे तिकडे फिरू लागतात आणि अनेक प्रकारच्या हानिकारक गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो..
ही माहिती आवडली असल्यास आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला नक्की शेयर करा. अन् शेती विषयक बातम्या, शासकीय योजना फ्री मिळवण्यासाठी आजच आमचा 👉 9579334058 WhatsApp क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा…