शेतीशिवार टीम, 17 फेब्रुवारी 2022 : तुम्ही बँकेत, FDमध्ये म्युच्युअल फंड किंवा इतर कुठेही गुंतवणूक करू शकता, परंतु केवळ 3 महिन्यांत 3 महिन्यांत 2000 % हुन अधिक नफा मिळवणं कठीण आहे.मात्र, शेअर मार्केटमध्ये ते शक्य आहे. शेअर मार्केटमधील एका पेनी शेअरने अवघ्या तीन महिन्यांत 2000 % हुन अधिक रिटर्न्स दिले आहे.
पहा, कोणती आहे ती कंपनी :-
या स्टॉकचे नाव एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (SEL Manufacturing Company Limited) आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 16 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर Rs 9.75 वर बंद झाला.
तर तीनचं महिन्यांनंतर या शेयर्सने आश्चर्यचकित करत आता हीच किंमत 209.85 रुपयांवर गेली आहे. गेल्या आठवडाभरात हा शेअर अपर सर्किटमध्ये आहे. या काळात हा मल्टीबॅगर स्टॉक रु. 172.75 वरून रु. 209.85 पर्यंत वाढला आहे. हा 21.50% रिटर्न्स आहे.
गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक 72 रुपयांवरून 209.85 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत जवळपास 190% वाढ झाली आहे. गेल्या 2 महिन्यांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 24.95 रुपयांवरून 209.85 रुपयांपर्यंत वाढला आहे. या अल्पावधीत सुमारे 740% वाढ झाली आहे.
पहा 3 चं महिन्यात किती दिले रिटर्न्स ;-
जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम आज 21.50 लाख रुपये झाली असती.
तसेच, जर 2 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवलेल्या व्यक्तीची रक्कम आता 8.40 लाख झाली असती. जर गुंतवणूकदाराने फक्त एक महिन्यापूर्वी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर त्याची रक्कम 2.90 लाख झाली असती…