शेतीशिवार टीम, 17 फेब्रुवारी 2022 : 10 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या 2 शेयर्सने जबरदस्त रिटर्न्स दिले आहे. या दोन शेअर्समध्ये ज्याने पैसे गुंतवले ते करोडपती झाले आहे. हे शेयर्स आहेत अजंता फार्मा (Ajanta Pharma) आणि नॅटको फार्माचे (Natco Pharma) शेअर्स आहेत.
शेअर मार्केटमध्ये या दोन कंपन्यांच्या शेअरची कामगिरी इतकी दमदार राहिली आहे की, एक लाख रुपये गुंतवणारी व्यक्ती आज करोडपती झाली आहे. या शेयर्सने लोकांना 29,000% हून अधिक रिटर्न्स दिले आहे.
अजंता फार्मा (Ajanta Pharma) : 1 लाखांचे झाले 3 कोटी रुपये…
6 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर अजंता फार्माचा (Ajanta Pharma) शेअर 6.71 रुपये होता. 17 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स रु. 2008 च्या पातळीवर बंद झाले आहेत. कंपनीच्या समभागांनी 13 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 29,900 टक्के परतावा दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 6 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर ती रक्कम सध्या 2.99 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,435 रुपये आहे. त्याच वेळी, 52-आठवड्यांची निम्न पातळी 1,660 रुपये आहे…
नॅटको फार्मा (Natco Pharma) : 1 लाखांचे झाले तब्बल 1 कोटी रुपये…
6 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर नॅटको फार्माचे (Natco Pharma) शेअर्स 8.81 रुपयांच्या लेव्हलवर होते. 17 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 881.10 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेयर्सने 13 वर्षांच्या कालावधीत जवळपास 10,000% रिटर्न्स दिले आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 6 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आजच्या तारखेला ही रक्कम 1 कोटी रुपये झाली असती. कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,189 रुपये आहे. तसेच, 52-आठवड्यांची निम्न पातळी 771.50 रुपये आहे.