Take a fresh look at your lifestyle.

Google Pay यूजर्ससाठी खुशखबर ; काही मिनिटांत घ्या, 1 लाखांपर्यंत पर्सनल लोन ; जाणून घ्या कसे ?

0

शेतीशिवार टीम, 17 फेब्रुवारी 2022 : तुम्हीही गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हाला ते ऐकून आनंद झाला असेल. जर तुम्ही काही कारणास्तव कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आणखी फायदेशीर ठरू शकते.

आता तुम्ही Google Pay द्वारे काही मिनिटांत पर्सनल लोन देखील घेऊ शकता. झालं असं की, सोमवारी, DMI Finance Private Limited (DMI) या फायनान्स कंपनेने Google Pay वर पर्सनल लोन प्रॉडक्शन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Google Pay द्वारे कर्ज घेण्यासाठी, तुमच्याकडे Google Pay असणे आवश्यक आहे. तसेच, या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Google Pay वापरावं लागेल आणि तुमचा क्रेडिट स्कोरही चांगला असायला हवा. या दोन्ही गोष्टी जर जुळत असल्यास, तुम्हाला काही मिनिटांत 1 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकतं.

DMI Finance ने सुरू केली ही योजना..

DMI Finance Limited Google Pay च्या सहकार्याने हे डिजिटल पर्सनल लोन मिळू शकतं…

Google Pay यूजर्सना होणार फायदा… 

Google Pay युजर्सना या योजनेचा दुहेरी फायदा मिळू शकतो, कारण या आधी तुम्ही Google Pay ची सेवा घेऊ शकता. तसेच, तुम्ही सहजपणे कर्जाचा लाभ घेऊ शकाल. काही अटी आणि नियमांनुसार, म्हणजे क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर पहिल्यादा प्री-क्वालिफाइड एलिजिबल यूजर्स निवडून त्यांना प्रथम कर्ज दिले जाईल.

जर तुम्ही प्री-अप्रूव्ड कस्टमर असाल तर तुमच्या कर्ज अर्जावर Instant Loan Application प्रोसेस केली जाईल. अवघ्या काही मिनिटांत तुमच्या बँक खात्यात 1 लाख रुपयांपर्यंतची कर्जाची रक्कम येईल. हे कर्ज ३६ महिन्यांत फेडायचे आहे.

कर्ज फेडण्यासाठी आहे 36 महिन्यांचा कालावधी.

ही रक्कम जास्तीत जास्त 36 महिन्यांत (तीन वर्षांत) परत करता येते. या भागीदारीअंतर्गत 15 हजारहून अधिक पिन कोडसाठी तात्काळ वैयक्तिक कर्ज सुविधा सुरू करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.