Voter Id ला Aadhaar शी लिंक करण्याची प्रोसेस झाली सुरु ; फक्त 2 मिनिटात ‘या’ 5 स्टेप्स फॉलो करा अन् लिंकिंग करून घ्या..
शेतीशिवार टीम : 05 सप्टेंबर 2022 : फेक मतदान रोखण्यासाठी भारत सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येत आहे. हे काम तुम्ही घरी बसूनही करू शकता. यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलची गरज लागेल. लिंकिंग प्रोसेस काय आहे ते आपण जाणून घेउयात…
ऑनलाइन लिंकिंग प्रोसेस :-
आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमची रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. प्रोसेस काय आहे ते जाणून घ्या..
तुम्हाला एनवीएसपी पोर्टल https://nvsp.in/ उघडावं लागेल. यासाठी तुम्ही डायरेक्ट या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन देखील करू शकता.
येथे तुम्हाला प्रथम New User या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
तुम्ही हे करताच तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल.
तुम्ही तो एंटर करताच, एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि सबमिट करावी लागेल. सबमिट झाल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल.
सर्व माहिती सबमिट केल्यानंतर,ऑटोमेटिक एक्नॉलेजमेंट नंबर जेनरेट होईल. तो तुम्हाला सेव करावा लागेल.
तुमचा मतदार आयडी आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही क्नॉलेजमेंट नंबर वापरू शकता…
SMS नेही होऊ शकतं लिंकिंग :-
तुम्ही SMS द्वारेही आधार आणि मतदार आयडी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 166 किंवा 51969 वर संदेश पाठवावा लागेल. हा मेसेज पाठवताना तुम्हाला ECLINK स्पेस EPIC नंबर स्पेस आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही हे काम पूर्ण करू शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला फोनवर आधार कार्ड क्रमांक आणि मतदार ओळखपत्राची डिटेल्स शेयर करावी लागेल.
ऑफलाइन प्रोसेसही समजून घ्या…
जर तुम्ही मतदार कार्ड ऑनलाइन लिंक करू शकत नसाल, तर तुम्ही यासाठी ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी अनेक बूथ लेव्हल ऑफिसर, BLO प्रत्येक राज्यात वेळोवेळी शिबिरे आयोजित करतात. येथे तुम्ही तुमच्या आधार आणि मतदार ओळखपत्राची सेल्फ अटेस्टेड कॉपी तुमच्या BLO ला द्या. तुमचा BLO लिंकिंग करून देईल…