शेतीशिवार टीम : 13 ऑगस्ट 2022 :- आपल्या सर्वांचं मोठ्या आकाराच्या फ्लॅटमध्ये राहायचं स्वप्न असतं. यासाठी आपण भरपूर पैसा खर्च करतो परंतु कमी बजेटमध्येही आपण मोठा फ्लॅट खरेदी करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का ? या कामात आपण लोडिंग फॅक्टर आणि योग्य क्षेत्राचे कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्हीही फ्लॅट घेण्याच्या तयारीत असाल तर फ्लॅटचा सुपर एरिया पाहून बुकिंग करू नका. आज आपण तुम्हाला कार्पेट एरियाचे कॅल्क्युलेशन कसे करायचे आणि कमी पैशात प्रशस्त फ्लॅट कसा घ्यायचा ते जाणून घेणार आहोत.
समान सुपर एरिया पण लहान- मोठा कार्पेट एरिया :-
फ्लॅट खरेदी करणाऱ्या सामान्य खरेदीदाराला सुपर एरिया आणि कार्पेट एरिया यातील मूलभूत फरक कळत नाही. एकाच सुपर एरियातील फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रही समान असते, असा सर्वसाधारण समज खरेदीदारांमध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात तसं नसतं.
फ्लॅटचा कार्पेट एरिया हे प्रोजेक्ट टेक-आउट आणि लोडिंगवर अवलंबून असते. बहुतेक डेव्हलपर्स सांगतात की, सुपर एरियावरील लोडिंग 20 ते 25% आहे, परंतु प्रत्यक्षात ते 40 ते 45% असतं . या प्रकरणात, ज्या प्रकल्पावर लोडिंग फॅक्टर कमी असतो, त्यामध्ये बांधल्या जाणाऱ्या फ्लॅटचा कार्पेट एरिया अधिक असतो. त्यामुळे समान सुपर एरिया असूनही फ्लॅटचा कार्पेट एरिया लहान -मोठा होत असतो.
या पद्धतीने मोजा मोजा फ्लॅटचा कार्पेट एरिया :-
समजा तुम्ही 1BHK फ्लॅट बुक करणार आहात आणि डेव्हलपरने त्या फ्लॅटचा सुपर एरिया 700 स्क्वेअर फूट म्हणून सांगितला आहे, तर मग या फ्लॅटचा कार्पेट एरिया काढण्यासाठी फ्लॅटचा लेआउट प्लॅन पहा आणि खाली दिलेल्या पद्धतीने कार्पेट एरिया स्पेसचे कॅल्क्युलेशन करा.
लेआउटच्या साईजने करा कॅल्क्युलेशन :-
बेडरूची साइज | 12*10 | 120 स्क्वेअर फूट |
लिव्हिंग रूमची साइज | 14*10.6 | 148.4 स्क्वेअर फूट |
किचन | 7*5 | 35 स्क्वेअर फूट |
टॉयलेट | 4.3*7.6 | 32.68 स्क्वेअर फूट
|
बाल्कनी | 4*4 | 16 स्क्वेअर फूट |
दूसरी बाल्कनी | 5*5 | 20 स्क्वेअर फूट |
या सर्व स्पेसला जोडल्यास फ्लॅटचे कार्पेट एरिया = 372.08 स्क्वेअर फूट.
म्हणजेच, जर डेव्हलपर्सने असे म्हटले की, प्रोजेक्ट लोडिंग फॅक्टर 25% आहे, तर 700 स्क्वेअर फूट फ्लॅटवरील लोडिंग = 175 चौरस फूट. अशा स्थितीत कार्पेट एरिया 525 स्क्वेअर फूट असावे, परंतु डेव्हलपर्स देत आहे सुमारे 372.08 चौरस फूट
जर 700 स्क्वेअर फूट सुपर एरिया असलेल्या फ्लॅटला सुमारे 372.08 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया मिळत असेल, तर याचा अर्थ त्या फ्लॅटवरील लोडिंग सुमारे 45% आहे.
कमी पैशात मोठा फ्लॅट कसा खरेदी करायचा :-
फ्लॅट बुक करण्यापूर्वी या पद्धतीने कार्पेट एरियाचे कॅल्क्युलेशन करा. तुम्ही ही पद्धत 1BHK, 2BHK किंवा 3BHK फ्लॅटमध्ये वापरू शकता. असे केल्याने, तुम्ही 700 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये 400 किंवा 450 चौरस फूट कार्पेट एरिया मिळवू शकता आणि कमी पैशात मोठा प्रशस्त फ्लॅट देखील खरेदी करू शकता…