शेतीशिवार टीम : 17 ऑगस्ट 2022 :- जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर अंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा व बार्टी,पुणेच्या सहकार्यातून श्रीगोंदा तालुक्यातील सुशिक्षित,होतकरु बेरोजगार युवकांना मोफत एक महिन्याचे दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे, आपणास प्रशिक्षणात दुग्ध जन्य पदार्थ तयार करण्या बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
उत्कृष्टपणे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या युवकांना उद्योजक म्हणुन आपला व्यवसाय सुरू करण्या करिता जिल्हा उद्योग केंद्र व बार्टी यांच्या साहाय्याने शासकीय 10 लाखांपर्यंत कर्ज प्रकरण करण्या -करीता आवश्यक ते सर्व मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे, तरी जास्तीत जास्त युवकांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपण दिनांक 31/07/2022 रोजी पर्यंत आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन विकास मंडळामार्फत करण्यात आलेले आहे.
पात्रता व अटी :-
1) प्रशिक्षण हे फक्त 40 च व्यक्तीसाठी असणार आहे.
२) प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवसाचा असेल.
३) 40 व्यक्तींची निवड ही थेट मुलाखत करून केली जाईल.
४) ज्या व्यक्तींना प्रशिक्षण घेऊन व्यवसाय करायचा आहे त्याच व्यक्तींनी प्रशिक्षण घ्यावे.
५) दिवसातून 4 तास प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
1) शाळा सोडल्याचा दाखला
2) आधार कार्ड
3) जातीचा दाखला
4) मार्कशीट
5) पासपोर्ट साइज एक फोटो
6) बँक पासबुक चे पहिले पेज झेरॉक्स.
संपर्क :- 1) श्री.निलेश मुनोत सर मो. नं. 9011794065
टीप :- अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक तरुणांनी जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर येथे भेट दयावी.
स्वतःची दूध डेयरी उघडण्यासाठी मिळवा 7 लाख रु. अनुदान ; पहा, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रोसेस पाहण्यासाठी :-
इथे क्लिक करा