Pune: फक्त 28 गुंठ्यात बारामतीच्या युवा उद्योजकाचा अनोखा प्रयोग, ‘या’ व्यवसायाची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही भुरळ, पहा यशोगाथा..
बारामती तालुक्याच्या माळेगावमधील गव्हाणे कुटुंबाने आर्थिक उन्नतीसाठी अवघ्या 28 गुंठे जागेत खेकडापालन, गावरान कोंबडी, बोकड, सेंद्रिय शेती असा अनेकांना प्रेरणादायी ठरणारा उद्योग उभारला आहे. संदीप शंकर गव्हाणे या 36 वर्षीय वाणिज्य शाखेच्या पदवीप्राप्त युवकाने आपली आई शांताबाई, भाऊ अमर, कैलास गव्हाणे यांच्या मदतीने पुणे जिल्ह्यात प्रथमच खेकडापालन करून एक वेगळा संदेश दिला.
काहींना हॉटेलमध्ये जेवताना विशेष करून खेकडा खायला मिळत नाही. यामुळे खेकड्याच्या जेवणाला अतिशय मोठी मागणी असते. शिवाय, गावरान कोंबडी व बोकडाचे ताजे मटण मिळणे अतिशय दुरापास्त झाले आहे. हाच विचार मनात करून खेकडा पालनाची अभिनव कल्पना सुचली.
यासाठी कावागज – शिरवली या रस्त्यावर माळेगाव हद्दीतील शिवनगरमध्ये खरेदी केलेल्या 28 गुंठ्यात विविध उपक्रम राबविले. प्रथम खेकडा पालनासाठी 44 फूट बाय 22 फूट आकाराचा सुमारे आठ फुटी चौकोनी बेड बनविला.
यामध्ये 5 फुटांवर दगड, माती, वाळू, मुरूम टाकून खेकड्यांचा अधिवास बनविला. यामध्ये नदी, नाले, तळी बनवून बाहराल खकड़ साडल आजराजा या बडमध्य सुमार तीन हजार खेकडे तयार आहेत. तसेच, सुमारे चारशे गावरान कोंबडींचे पालन केले आहे. शिवाय, शेतकऱ्यांकडून आणलेले वीस बोकड सांभाळले आहेत. तसेच, विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने गाजर, मुळा, कोथिंबीर, मका, विविध प्रकारच्या भाज्या, काकडी, लिंबू, मेथी तसेच घासाची शेती तयार केली आहे.
कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता स्वभांडवलाचे 35 लाख रुपये खर्च करून कै. शंकर गव्हाणे यांच्या स्मरणार्थ ‘तात्याचा रानमळा ढाबा’ नावाने इंजिनीअर गणेश नरुटे यांनी हॉटेल तयार केले. यासाठी बंधू गणेश, राजेंद्र, विजय, दत्तात्रय गव्हाणे यांची मोलाची साथ मिळाली.
दरम्यान, तात्यांचा रानमळा ढाबा या हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण खेकड्याचे विविध प्रकारचे जेवण, गावरान कोंबडी व बोकडाचे स्वच्छ व ताजे मटण ताट माफक दरात उपलब्ध करून दिले आहे.
शिवाय, घराच्या म्हशीच्या गावरान तुपापासून दहीधपाटे देखील मिळणार आहे. हॉटेलमध्ये घरगुती मसाले व सेंद्रिय शेतातील साहित्य वापरणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या शेतातील खेकडे, कोंबडा, बोकडाचे मटण देणार आहेत. तसेच, महिन्याला लाखभर रुपये उत्पन्न मिळू शकते, असा आशावाद संदीप गव्हाणे यांना वाटतो.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गव्हाणे यांच्या ‘तात्यांचा रानमळा ढाबा ला भेट देऊन खेकडा पालन, कोंबडी, बोकड पालन व सेंद्रिय शेती याची पाहणी करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उभारावत, अस आवाहन करून तरुणांनी गव्हाणे कुटुंबाचा आदर्श घ्यावा, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
योगेश भोसले