Take a fresh look at your lifestyle.

Pune-Aurangabad Expressway : जून महिन्यात होणार कामाचा श्रीगणेशा; आराखड्याचं काम झालं सुरु, अधिग्रहण प्रक्रियाही होणार लवकरचं सुरु

0

महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक कार्यक्षम करून जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यभरात 5,267Km एक्सप्रेस – वेचे जाळे तयार करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखली आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून 1,500 Km लांबीचे बांधकाम केलं जाणार असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या माध्यमातून 4,217Km लांबीच्या एक्सप्रेस – वे वर काम केले जाणार आहे.

या महामार्गांमध्ये नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा 701Km चा रस्ता पूर्णत्वाकडे आहे. यातील शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा लवकरच सुरू होत आहे, कारण समृद्धी महामार्ग 180Km जालना-नांदेड आणि 141Km नागपूर-गोंदिया या महामार्गाने वाढविला जाणार आहे. त्याचवेळी, 106Km गोंदिया-गडचिरोली आणि 156Km गडचिरोली-नागपूर महामार्ग हे समृद्धी महामार्गाचा भाग असणार आहे.

पुणे – औरंगाबाद एक्सप्रेस – वे ला केंद्रानेही मान्यता दिली असून दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते पुणे हे अंतर 8 तासांत पार करता यावं म्हणून पुणे- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सप्रेस – वेला समृद्धी महामार्ग जोडला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

आता पुणे – अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या एक्सप्रेस -वे बद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) हाती घेण्यात आलेल्या पुणे-औरंगाबाद एक्सप्रेस -वे च्या आराखडय़ाचे काम जयपूरमधील कंपनीने सुरू केलं आहे. तर MSRDC च्या माध्यमातून जून महिन्यांपर्यंत जमीन अधिग्रहणाचे काम सुरु होणार आहे.

268Km च्या आणि 10,080 कोटी रुपये खर्चाच्या या मार्गाचे प्रत्यक्ष काम 2023 पासून सुरू करण्याचे MHAI ने नियोजन आखलं आहे. पुणे रिंग रोडपासून (Pune Ring Road) सुरू होणारा पुणे – अहमदनगर – औरंगाबाद एक्सप्रेस – वे शेंद्रा एमआयडीसी (MIDC) येथून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुणे-औरंगाबाद हे प्रवास 2 तासांत तर पुणे ते नागपूर प्रवास 15 तासांऐवजी केवळ 8 तासात करता येणार आहे.

या मार्गाच्या आराखडय़ाच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी जयपूरमधील एमएसव्ही इंटरनॅशनल (INC) आणि आरमेंज इंजिनीयिरग अ‍ॅण्ड मेनेजमेंट कन्सल्टंट (ARMENGE Engineering and Management Consultants Pvt. Ltd) या भागीदारी कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आल्याची माहिती NHAI मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार MSRDC च्या पुणे रिंग रोड प्रॉजेक्टपासून या मार्गाला सुरुवात होणार असून औरंगाबादमधील शेंद्रा MIDC येथे मार्ग समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे.

पुरंदर, हवेली, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, पैठण अशा गावांतून हा मार्ग जाणार आहे. या मार्गाला रांजणगाव आणि बिडकीन अशी दोन प्रवेशद्वारे असणार आहेत. मात्र हा मार्ग प्रवेश नियंत्रण मार्ग (Access Control Road) असणार असल्याने दोन प्रवेशद्वार वगळता इतर कुठून या मार्गावर प्रवेश करता येणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अशा या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या आराखडय़ाचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे NHAI चे नियोजन आहे. आराखडा पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून जून 2023 मध्ये कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही NHAI मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

MSRDC चा मदतीचा हात. . .

10 हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी पुणे, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गावांमधील जमीन मोठय़ा संख्येने संपादित करावी लागणार आहे. या जमिनींच्या भूसंपादनातून जमीनदारांना 6000 कोटींचा मोबदला मिळणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

100 मीटर रुंदीप्रमाणे या मार्गासाठी जमीन लागणार आहे. यासाठी नेमकी किती जमीन संपादित करावी लागेल हे आराखडा पूर्ण झाल्यास स्पष्ट होईल. मात्र जमीन संपादनाची जबाबदारी MSRDC ची असणार आहे.

त्यानुसार राज्य सरकार, NHAI आणि MSRDC मध्ये चर्चा झाली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकार, NHAI आणि MSRDC यांच्यामध्ये यासंबंधी करार होणार आहे. MSRDC तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

राज्यभर विणलं जाणार 5267Km चं जाळ. . .

वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक कार्यक्षम करून जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्यभरात 5,267 Km एक्स्प्रेस वेचे जाळे तयार करण्याची योजना महाराष्ट्र सरकारने आखली आहे. कॉर्पोरेशन सुमारे 4,217 Km लांबीच्या द्रुतगती मार्गांवर काम करत आहे आणि NHAI द्वारे सुमारे 1,050 किमी लांबीचे बांधकाम केले जाईल.

MSRDC च्या प्रकल्प प्रस्तावानुसार, 4,217 किमीपैकी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा 94 Km आधीच पूर्ण झाला आहे, आणि नागपूर-पुणे समृद्धी महामार्गाचा 701 Km पूर्णत्वाकडे आहे. यातील पहिला टप्पा लवकरच सुरू होत आहे कारण समृद्धी महामार्ग 180 Km जालना-नांदेड आणि 141Km नागपूर-गोंदिया महामार्गाने वाढविला जाणार आहे. त्याचवेळी, 106 Km गोंदिया-गडचिरोली आणि 156 Km गडचिरोली-नागपूर महामार्ग समृद्धी महामार्ग विस्ताराचा भाग असणार आहे.

याशिवाय मुंबई आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे 318Km लांबीच्या कोकण द्रुतगती महामार्गाने जोडले जाणार आहेत, तर मुंबई महानगर प्रदेशात विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग विकसित केला जाणार असून तो ९८ Km लांबीचा असेल. पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 168 Km महामार्ग बांधण्यात येणार आहे, ज्यामध्ये 760Km नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि 180Km पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग या दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे, या दोन्हीं पकल्पांच्या नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत.

मराठवाड्याच्या विकासासाठी 300Km शिरूर-बीड-लातूर राज्य सीमा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून, नाशिक-धुळे-जळगाव-अमरावती-नागपूर यांना 650Km लांबीच्या प्रस्तावित महामार्गाने जोडले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात 125 Km औरंगाबाद-जळगाव महामार्ग आणि 240Km शेगाव-अकोला-नांदेड महामार्गाचाही समावेश आहे. कर्जवसुली आणि सरकारी निधीतून ही दोन्ही आव्हाने पेलून महामार्ग पूर्ण केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

5,267Km पैकी 1,050 Km NHAI द्वारे कार्यान्वित केले जातील आणि विविध राज्यांमधून जाणारे महामार्ग महाराष्ट्राशी जोडले जातील. त्यात औरंगाबाद-पुणे महामार्ग (270 Km, राज्याचा भाग), सुरत ते चेन्नई महामार्ग (450 Km, राज्याचा भाग), दिल्ली-मुंबई महामार्ग (110 Km , राज्याचा भाग), आणि पुणे-बेंगळुरू महामार्ग 220 Km लांबीसह राज्याचा भाग असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.