शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : जिल्हा बँकेची हॅट्रिक केलेले संचालक निवृत्तिअण्णा गवारे यांनी आपल्या उमेदवारांचा अर्ज बुधवारी (ता.1) दाखल केला. त्यानंतर गुरुवारी आमदार अशोक पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

शिरूर सोसायटी मतदारसंघातील (अ वर्ग संस्था) मतदारयादीतील एकूण 131 मतदारांनी आपला कल द्यायची ही निवडणूक आहे. या निवडणुकीत माजी आमदार बाबूराव पाचर्णे सध्या वैयक्तिक कारणांनी दूर आहेत, तर माजी सभापती मंगलदास बांदल हे कारागृहात आहेत.

अशा स्थितीत गवारे यांनी आपली उमेदवारी अर्ज भरून चौथ्यांदा शड्डू ठोकताच आमदार पवार यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी अर्ज भरून आपल्या उमेदवारांचे अधिकृत रणशिंग फुंकले.

आमदार पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी सूचक संतोष जगताप; तर अनुमोदक म्हणून संतोष रणदिवे हे आहेत. यावेळी बोंद्र काळे, मोनिका बाळासाहेब नरके, दिलीप मोकाशी राजेंद्र जगदाळे,

शशिकांत दसगुडे, बाबासाहेब फराटे पंडित दरेकर, राजेंद्र नरवडे, स्वप्पल गायकवाड, विश्वासकाका ढमढेरे राजेंद्र खांदवे, भाऊ बारघडे, सचिन पवार, अण्णा महाडीक, नरेंद्र माने रमेश मेमाणे आदींसह शेकडो समर्थक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *