Take a fresh look at your lifestyle.

IND vs NZ 2nd Test : टॉस होण्यापूर्वीचं BCCI चं ट्विट ; अजिंक्य रहाणेसह ‘हे’ 2 मुख्य खेळाडू मुंबई कसोटीतून बाहेर !

0

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होत आहे.

पावसामुळे मैदान ओले झाल्यामुळे या सामन्यात नाणेफेक होण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्याने सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. BCCI ने याबाबत माहिती दिली. तिन्ही खेळाडू दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्याचं कारण सांगितलं आहे.

BCCI ने एका निवेदनात म्हटले आहे की, कानपूरमधील पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या बोटाला दुखापत झाली आणि तो मुंबईतील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयचे मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार आहे. कानपूरमधील पहिल्या कसोटीत अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली.

स्कॅन केल्यानंतर त्याच्या खांद्याला सूज असल्याचं आढळून आलं . त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्यामुळे तो मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना अजिंक्य रहाणेला दुखापत झाली. तो पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यामुळे त्याला मुंबई कसोटीतून वगळावं लागलं आहे. .

वृत्तानुसार, कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करू शकतो. अहवालानुसार विल्यमसनला अजूनही कोपर आणि खांद्याला दुखापत झाली असून तो दुसऱ्या कसोटीला मुकला आहे.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि प्रख्यात समालोचक सायमन डूले यांनीही विल्यमसन दुसऱ्या कसोटीत खेळत नसल्याचे आणि टॉम लॅथम कर्णधार म्हणून त्याची जागा घेत असल्याचे संकेत दिले आहेत. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत दोन कसोटी सामने झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये भारताचाच वरचष्मा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.